गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी हीची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. याचे कारण असे की, पाकिस्तान संघाचा २० वर्षीय डावखुरा जलद गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्यासोबत अक्साचा साखरपुडा करण्यात येणार आहे. या गोष्टीची माहिती आफ्रिदीने रविवारी (०७ मार्च) आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केली होती.
अक्साच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, आफ्रिदीला अक्सा, असमारा, अंशा, अज्वा आणि अरवा अशा पाच मुली आहेत. त्यातील २० वर्षीय अक्सा सर्वात थोरली आहे. अक्साचा जन्म १५ डिसेंबर २००१ रोजी झाला होता. अक्सा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे .
अक्सा ही दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे ती आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती प्रसिद्ध क्रिकेटपटू आफ्रिदीची मुलगी असली तरीही तिने प्रसिद्धीच्या आयुष्यापासून स्वतःला खूप दूर ठेवलं आहे. आफ्रिदीने अक्साबरोबर त्याच्या पाचही मुलींना प्रसिद्धीच्या आयुष्यापासून दूर ठेवले आहे. त्याच्या मुली काहीवेळा पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याचे सामने पाहायला येतात.
https://www.instagram.com/p/B8je7XBlj6O/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CI0d_SDlMuf/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CIdIRJxF_bz/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/Bi-NTFpg_xO/?utm_source=ig_web_button_share_sheet
शाहीन आफ्रिदीच्या कुटुंबीयांनी दिली माहिती
शाहीनचे वडील अयाज खान यांनी आपल्या लेकाच्या लग्नाची माहिती जगजाहीर केली. पाकिस्तानी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले, ‘आम्ही शाहीनच्या लग्नासाठी शाहिदच्या घरी प्रस्ताव पाठवला होता, जो त्यांनी स्विकार केला आहे. ४१ वर्षीय शाहिदची मोठी मुलगी अक्सा आफ्रिदी हिच्यासोबत शाहीनचा साखरपुडा होणार आहे. मात्र अक्सा सध्या तिचे शिक्षण पूर्ण करत असल्याने येत्या २ वर्षात त्यांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे.’
शाहीन आफ्रिदीची कामगिरी
पाकिस्तानी संघाचा २० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तान संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. २०१८ मध्ये पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आफ्रिदीने २१ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने २४ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने खेळलेल्या एकूण २२ वनडे सामन्यात ४५ गडी बाद केले आहेत. यात त्याने २ वेळा ५ पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अगग, लग्नाआधीच जावई प्रेम जगजाहीर! शाहिद-शाहीनचा ‘तो’ व्हिडिओ भन्नाट व्हायरल, लोक घेतायत मजा
४१ वर्षीय शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर साखरपुडा
अबब! वनडेत २३१ च्या फलंदाजी सरासरीने कुटल्या धावा, ‘ही’ खेळाडू यंदा ठरली ‘प्लेअर ऑफ द मंथ’