---Advertisement---

अफ्रिदीला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विकेटचे शतक करण्याची शेवटची संधी

On: गुरूवार, मे 31, 2018 6:43 PM
---Advertisement---

आज विश्व एकादश विरुद्ध टी-२० विश्वविजेते विंडीज यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला आंतराष्ट्रीय टी20 मध्ये एक मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे.

त्याला आता आंतराष्ट्रीय टी20 मध्ये 100 विकेट पूर्ण करण्यासाठी फक्त 3 विकेटची गरज आहे.तसेच त्याने जर हा टप्पा पार केला तर तो आंतराष्ट्रीय टी20 मध्ये 100 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरेल.

सध्या आफ्रिदीने आंतराष्ट्रीय टी20 मध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच तो आंतराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

आज होणाऱ्या सामन्यात आफ्रिदी विश्व एकादश संघाचे नेतृत्व करणार आहे. हा सामना इंग्लंडमधील लाॅर्ड्स मैदानावर होणार आहे.

विंडीजमधील क्रिकेट स्टेडियमच्या दुरूस्तीसाठी निधी गोळा करण्यासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हा सामना आयोजित केला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हरीकेन इम्रा आणि हरीकेन मरीया या वादळामळे वेस्टइंडीजमधील क्रिकेट स्टेडीयम्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या सामन्याला आंतराष्ट्रीय क्रिकेट समितीने आंतराष्ट्रीय सामन्याचा दर्जा दिला आहे.

आंतराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज:

97 विकेट्स: शाहिद आफ्रिदी

90 विकेट्स: लसिथ मलिंगा

85 विकेट्स: उमर गुल

85 विकेट्स: सईद अजमल

75 विकेट्स: शकिब अल हसन

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

–आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा

-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली

-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख

-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

–आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment