भारत आणि पाकिस्तान (ind vs pak) या कट्टर विरोधी देशांमध्ये जेव्हा कधी क्रिकेटचा सामना होतो, तेव्हा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. यावर्षी आयसीसी टी-२० विश्वचषक (t20 world cup 2021) पार पडला आणि चाहत्यांना भारत- पाकिस्तान सामना देखील पाहायला मिळाला. पाकिस्तानने यावर्षी पहिल्यांदाच विश्वचषकात भारताचा पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी (shaheen afridi) याने अप्रतिम प्रदर्शन केले होते. आता पाकिस्तानचा माजी दिग्गज शाहिद अफ्रिदी (shahid afridi) याने या सामन्याविषयी एक खुलासा केला आहे.
शाहीन अफ्रिदीने टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध खेळलेल्या सामन्यात ३१ धावा खर्च करून तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले होते. या सामन्यात शाहीनने सुरुवातीच्या षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना स्वस्तात बाद केले होते. आता पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने शाहीन अफ्रिदीच्या प्रदर्शनाविषयी मोठी खुलासा केला आहे. शाहिद अफ्रिदीने सांगितले की, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शाहीनने त्याला फोन केला होता आणि तो दबावात होता.
हेही वाचा- पदार्पणात भीषण अपघात, आफ्रिदीचा बाऊंसर डोक्याला लागल्याने बांगलादेशचा खेळाडू गंभीर जखमी
शाहिद अफ्रिदी याबाबातीत बोलताना म्हणाला, “भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्याच्या आधी शाहीनने मला व्हिडिओ कॉल केला होता आणि म्हणाला की, मला दबाव जाणवत आहे. आम्ही अंदाजे ११ किंवा १२ मिनिट चर्चा केली. मी त्याला म्हणालो, देवाने तुला ही संधी दिली आहे की, तेथे जा आणि चांगले प्रदर्शन कर. तू जा आणि सुरुवातीचे विकेट्स मिळव आणि तू सामन्याचा हिरो बनशील. देवाच्या इच्छेने त्याने अगदी असेच केले.”
दरम्यान, यावर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांविरुद्धच्या सामन्याने अभियानाची सुरुवात केली होती. विश्वचषकाची १३ व्या सामन्यात हे संघ आमने सामने आले होते, जो २४ ऑक्टोबरला खेळला गेला होता. पाकिस्तानने या सामन्यात एकही विकेट न गमावता विजय मिळवला होता. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने आयसीसी विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या –
…म्हणून ऍलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा पश्चाताप
‘अश्विन श्रीलंकेत जन्मला असता तर…’, आइसलंड क्रिकेटचे गमतीशीर ट्वीट सोशल मीडियावर ठरतेय चर्चेचा विषय
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
व्हिडिओ पाहा –