सध्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा लंका प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहे. तो या लीगमध्ये गाले ग्लेडियटर्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. आफ्रिदीने श्रीलंकेच्या या लीगमध्ये आपण कोणत्या कारणासाठी खेळत आहे, याचा खुलासा केला.
तो म्हणाला की, माझे ध्येय युवा खेळाडूंना तयार करणे आहे. आफ्रिदीने ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी श्रीलंका सरकारचे आभार व्यक्त केले आणि त्याला विश्वास आहे की, एलपीएल भविष्यात खूप यश प्राप्त करेल.
ही स्पर्धा देशांतर्गत क्रिकेटच्या विकासासाठी मदत करेल: आफ्रिदी
त्याला खात्री आहे की, ही लीग देशात क्रिकेटच्या विकासासाठी मदत करेल आणि स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य सुधारण्यासाठी संधी मिळेल. द काश्मीर मॉनिटरशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, “ही नवीन लीग आहे आणि श्रीलंकेच्या दृष्टीकोनातून देशात क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे.”
तो पुढे म्हणाला, यासारख्या स्पर्धेत आपल्याला काही युवा खेळाडूंना पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करता येईल. येथे देशांतर्गत स्तरावर चांगली प्रतिभा आहे आणि माझ्याने जे शक्य आहे तेवढे मला त्यामध्ये योगदान द्यायचे आहे.”
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही दिग्गजांनी घेतली माघार
एलपीएल सुरू होण्यापूर्वी ख्रिस गेल, लियाम प्लंकेट, सरफराज अहमद, लसिथ मलिंगासारख्या बर्याच दिग्गजांनी माघार घेतली होती. जेव्हा याबद्दल आफ्रिदीला विचारण्यात आले, त्यावर तो म्हणाला, “सुरुवात करणे वास्तवात महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे क्रिकेटचा खेळ काही काळ थांबला होता, परंतु आपण बघतोय की लोक नवीन नियमासाठी अनुकूल होत आहेत आणि आवश्यक सावधानतेसोबत खेळांचे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले आहेत. यासाठी श्रीलंका सरकार आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सलाम आहे.
आफ्रिदी म्हणाला, हे अवघड होतं, परंतु चाहत्यांसाठी योग्य होतं.”
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या-जडेजा जोडीची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशतकी भागीदारी करत मोडला १० वर्षापूर्वीचा रेकॉर्ड
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई






