सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत खेेळवल्या गेलेल्या दोनही सामन्यात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याने कर्णधार बाबर आझम याच्यावर सडकून टीका केली आहे. त्याने असा दावा केला आआहे की बाबर रणनिती बनवताना संघातील दुसऱ्या वरीष्ठ खेळाडूंचा सल्ला घेत नाही. तसेच आफ्रिदीने निवड प्रक्रियेत सक्रियरीत्या न भाग न घेण्याबाबत फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद यूसुफ यांच्यावर देखील निशाना साधला. त्याने मोहम्मद रिझवान याला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, “एक कर्णधार म्हणून माझे नेहमी हेच मत आहे की नेतृत्व करणारा नेहमी चांगला असला पाहिजे आणि हे सर्व खेळाडूंना एकत्र ठेवून साध्य करता येते. याचा अर्थ असा आहे की संघासाठी रणनिती तयार करताना वरीष्ठ खेळाडूंसोबत चर्चा केली पाहिजे . जर तुम्ही संघातील वरीष्ठ खेळाडूंऐवजी बाहेरील लोकांचा जास्त सल्ला घेता, तेव्हा तुम्हाला याचे नुकसान होते.”
पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद यूसुफ (Mohammad Yousuf) यांनी सामना संपल्यानंतर माध्यंमाशी उपकर्णधार आणि मोहम्मद रिझवान याच्या खराब फॉर्मबाबत चर्चा केली. ते म्हणालेे की संघाच्या निवडीमध्ये त्यांची कोणत्याही प्रकारची भुमिका नाहीये. यावर प्रतिक्रिया देत आफ्रिदी म्हणाला की, “माझ्या मते यूसुफने चांगले उत्तर दिले नाही आणि मला वाटत की मोहम्म्द रिझवान (Mohammad Rizwan) याला विश्रांतीची गरज आहे. पाकिस्तानला कसोटी सामन्यात त्याच्या जागी सरफराज एहमद (Sarfaraz Ahmed) याला घेतले पाहिजे.”
मुलतान येथे खेळवल्या गेेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 26 धावांनी पराभूत केले आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. इंग्लंड आणि पाकिस्तान या संघातील तिसरा कसोटी सामना 17-21 डिसेंबर यादरम्यान कराची येथे खेळवला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटीत विराट स्वस्तात बाद! बांगलादेशी फिरकीपटूच्या जाळ्यात सहज अडकला माजी कर्णधार
धोनीनंतर रिषभ पंतच करू शकलाय ‘अशी’ कामगिरी, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झाला मोठा विक्रम