पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने 2017 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु त्याला नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडते. आफ्रिदीची विधाने कधीकधी इतकी टोकदार असतात की, ती त्याच्यासाठीच त्रासदायक होऊन बसतात. सध्या शाहिद आफ्रिदीच्या हृदयात तालिबानबद्दल प्रेम जागृत झाले आहे. त्याने या संघटनेचे जाहीरपणे कौतुक केले आहे. त्याने दावा केला आहे की, अफगाणिस्तानमध्ये महिलांना जे पाहिजे ते करण्याची परवानगी असेल आणि क्रिकेटलाही तालिबानचा फायदा होईल.
शाहिद आफ्रिदीने माध्यमांना सांगितले की, ‘तालिबान खूप सकारात्मक विचारांची चौकट घेऊन आला आहे. मुद्दा हा आहे की, या गोष्टी यापूर्वी कधीही आपल्या समोर आल्या नव्हत्या. पण आता गोष्टी खूप सकारात्मकतेकडे जात आहेत. स्त्रियांना काम करण्याची परवानगी आहे, राजकारण आणि इतर नोकऱ्या करण्यास परवानगी आहे. तालिबान आपल्या टीकाकारांचेही समर्थन करतात, ते क्रिकेटला पाठिंबा देत आहेत. मला वाटते की त्यांना क्रिकेट खूप आवडते.’
https://twitter.com/nailainayat/status/1432414021655748608?s=20
शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, भारताबरोबरच पाकिस्तानच्या लोकांनीही या माजी अष्टपैलूला भयंकर सुनावले आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने आफ्रिदीला तालिबानचा पंतप्रधान बनवण्याचा सल्लाही दिला.
https://twitter.com/moronhumor/status/1432525534832087040?s=20
https://twitter.com/ExSecular/status/1432493328944095233?s=20
https://twitter.com/pakistan_untold/status/1432427394602725377?s=20
दरम्यान अमेरिकन सैन्याने सोमवारी रात्री (30 ऑगस्ट) आपल्या सैन्याची शेवटची तुकडी माघारी बोलावली आहे. त्यामुळे तालिबान्यांचे आता अफगाणिस्तात संपूर्ण वर्चस्व प्रस्तापित झाले आहे.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खाननेही आपल्या देशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच इंग्लंडचे माजी खेळाडू केविन पीटरसन यांनी राशीद खानची परिस्थिती सांगताना म्हटले होते की, ‘अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान आपल्या देशातील परिस्थितीमुळे चिंतेत आहे. कारण राशीद आपल्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यास यश येत नाही आहे.’
पीटरसन पुढे म्हणाला, ‘अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आम्ही याबद्दल बरीच चर्चा केली आहे आणि राशीद खूप काळजीत आहे. तो आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यास असमर्थ आहे. त्याच्यासाठी ही वेळ खूप कठीण आहे. तो इतक्या दबावाखाली राहून देखील स्पर्धेत खूप चांगलं प्रदर्शन करत आहे. हे खूप प्रेरणादायी आहे.’ दरम्यान राशीदने केलेल्या ट्विटनंतर चाहत्यांनी ट्विटचा पाऊस पाडत त्याचे मनोधैर्य वाढवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सध्या कर्णधार कोहलीपुढे एकच पर्याय आहे, तो म्हणजे…,’ संघ निवडीबाबत दिग्गजाचा महत्त्वाचा सल्ला
‘विवादानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कैद केले,’ रिकी पाँटिंगने सांगितली लँगरची आपबिती
बीसीसीआयने जाहीर केले रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार सामने






