Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाहिद आफ्रिदीच्या मोठ्या मुलीचे हात पिवळे, लग्नासाठी शाहीन आफ्रिदीनेही लावली हजेरी

शाहिद आफ्रिदीच्या मोठ्या मुलीचे हात पिवळे, लग्नासाठी शाहीन आफ्रिदीनेही लावली हजेरी

December 31, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shahid Afridi daughter marriage

Photo Courtesy: Twitter/imransiddique89


पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान निवडकर्ता शाहिद आफ्रिदी याची मोठी मुलगी अक्सा हीचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. अक्साचा विवाह शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) नसीर नासिर खान याच्यासोबत कराचीमध्ये झाला. आफ्रिदीच्या मोठ्या मुलीच्या लग्नात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने देखील हजेरी लावली, जो की याच घरचा होणारा जावई आहे. अक्साच्या विवाहाचे फोटो आता सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मौलवी नासिर खान (Nasir Khan) याला इस्लाम धर्मातील लग्नातील परंपरागत गोष्टी करताना दिसत आहे, यामध्ये त्यांच्या मागे शाहिद आफ्रिदी याच्यासोबत शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) देखील उभा आहे. शाहिद आफ्रदी याला एकूण 5 मुली आहेत, ज्यामध्ये अक्सा सर्वात मोठी आहे. दुसरी मुलगी अंशा आफ्रिदी आहे, जिचे लग्न शाहिनसोबत होणार आहे. त्यानंतर असमारा, अज्वा आणि अरवा आफ्रिदी यांचा क्रमांक लागतो.

Shahid Afridi daughter Aqsa's Nikah in Karachi @SAfridiOfficial @iShaheenAfridi pic.twitter.com/Zd6USavkeB

— ٰImran Siddique (@imransiddique89) December 30, 2022

अक्सा आणि नसीर यांच्या लग्नातील जेवणाच्या मेन्यूचा फोटो देखील व्हायरल होत आहे, ज्यात स्वादिष्ट व्यजंनांचा समावेश आहे. या व्यंजनामध्ये चपली कबाब, मटन चाप, मटन कुन्ना, पेशावरी कढाई आणि पालक पनीर यांचा समावेश आहे. तसेच गोड पदार्थांमध्ये जिलेबी, मालपूरा मलाई, आईसक्रिम आणि हलवा हे देखील ताटात वाढले गेले.

आता अक्साच्या लग्नानंतर आफ्रिदीची दुसरी मुलगी अंशा हीचा विवाह शाहिनसोबत लवकरच होऊ शकतो. शाहिन दुखापतीमुळे क्रिकेटपासून बऱ्याच काळापासून लांब आहे. शाहिनला ही दुखापत ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लागली होती. या सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच नवे पीसीबी अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते म्हणून शाहीद आफ्रिदी याची निवड केली. या दोघांनी सुत्र हाती घेताच काही महत्वाचे निर्णय देखील घेतले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ गोलंदाजांनी गाजवली 2022मध्ये कसोटी, सर्वाधिक विकेट ‘या’ गोलंदाजाच्या नावावर
2022 मधील ‘या’ पाच पार्टनरशिप्स नाही विसरू शकणार चाहते! यादीत विराट, वॉर्नरसारख्या दिग्गजांचा समावेश


Next Post
Photo Courtesy: twitter/@mipaltan

कसोटी, वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीयांची सरत्या वर्षात चमकदार कामगिरी, पाहा बीसीसीआयची खास यादी

hardik pandya Krunal pandya Amit Shah

अमित शहांना भेटला हार्दिक पंड्या आणि भाऊ कृणाल, सोशल मीडियावर फोटो चर्चेत

Photo Courtesy: bcci.tv

रिषभ पंतच्या अपघाताला नवीन वळण! डीडीसीएला स्वतः सांगितला घडला प्रकार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143