---Advertisement---

पाकिस्तानी संघाचं टेन्शन वाढलं! दुखापतग्रस्त शाहीन आफ्रिदी सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकणार

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 1:46 PM
Shaheen-Afridi-Pakistan
---Advertisement---

पाकिस्तानी संघ सध्या नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहे. यावेळी बाबर आझम आणि संपूर्ण संघाला आशिया चषकासाठी तयारी मिळावी यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात होता. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानी संघाला एक मोठा झटका बसला असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी संघाचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीच्या कारणामुळे या मालिकेतील सामने खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा एकदिवसीय गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची खेळू शकणार नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी अनुपलब्ध आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघाला शाहीन आफ्रीदी शिवाय नेदरलँड्स संघाचा सामना करावा लागणार आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर

सीएसकेसाठी आता धोनी नव्हे तर फाफच्या नेतृत्वात खेळणार मोईन अली, श्रीलंकन फिरकीपटूवरही संघात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---