पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शहानवाज दहानी याम मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले. दहानीचा जन्म 5 ऑगस्ट 1998 रोजी एका गरीब कुटंबात झाला होता. पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याच्या वडिलांची इच्चा होती की त्याने शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करावी, पण शहानवाजचे मन मात्र क्रिकेटमध्येच रमले. चला तर थोडक्यात जाणून घेऊया एकेकाळी मित्रांचे शूज घालून खेळणाऱ्या शहानवाजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास.
शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) पाकिस्तानच्या लरकाना जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्माला होता. तो त्याच्या गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील पहिलाच आहे, जो पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी खेळत आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात देखील दहानी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे. रविवारी (28 ऑगस्ट) भारताविरुद्ध खेळताना त्याला एकही विकेट मिळाली नाही. परंतु शुक्रवारी (2 ऑगस्ट) हाँगकाँगविरुद्ध खेळताना त्याने 2 षटकात ७ धावा खर्च करून 1 विकेट घेतली.
शाहनवाजच्या वहिलांची नेहमीच इच्छा होती की, त्याने बी.कॉम मधून शिक्षण पूर्ण करावे आणि पुढे नोकरी करावी. एका मुलाखतीत शाहनवाज म्हणाला की, “आम्ही टेनिस बॉल आणि टॅप-बॉलने मैदानात खूप क्रिकेट खेळतो, पण त्याला आपण कधी गंभीरतेने घेत नाही. तुम्ही थोडा वेळ खेळता आणि नंतर शेतात काम करता, किंवा शिक्षणात चांगले असाल, तर ते करता.”
पडिलांची इच्छा असल्यामुळे शाहनवाजने शिक्षण आणि शेतीमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्या भावाला जेव्हा त्याची आवड समजली, तेव्हा त्याने स्वतःच्या मित्राकडे शाहनवाजसाठी विचारणा केली. शहानवाजच्या भावाचा मित्र तेव्हा अल शाहबाज क्रिकेट क्लबमध्ये सराव करत होता आणि त्याने शाहनवाजला देखील त्याठिकाणी बोलवले. शहानवाजने सांगितले की, क्लबमध्ये तो पहिल्यांदाच लेदर बॉलने खेळला होता. तसेच त्यावेळी त्याच्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे क्रिकेट कीट आणि शूज हीच होती.
The story of Shahnawaz Dahani is a story of resilience, confidence and faith in a dream.
Aur jab qismat badlay to tayyari poori honi chahiye na?
Dahani ka #LevelHai 👌🏼
(𝑩𝒂𝒔𝒆𝒅 𝒐𝒏 𝒕𝒓𝒖𝒆 𝒆𝒗𝒆𝒏𝒕𝒔) #HBLPSL7 l @ShahnawazDahani pic.twitter.com/uIbrofFnC5
— PakistanSuperLeague (@thePSLt20) January 19, 2022
याविषयी बोलताना शाहनवाज म्हणाला की, “मी माझ्या मित्राकडून शूज आणि मोजेही उधार घ्यायचो. कधी-कधी दररोज मी एक नवीन जोडी घालून यायचो, ज्यामुळे क्लबमध्ये सर्वांना वाटायचे की, मी श्रीमंत आहे. मी शर्ट आणि दुसऱ्या गोष्टीही मित्रांकडून उधार घ्यायचो.” दरम्यान, शाहनवाजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 10 सामन्यांमध्ये 1050 धावा खर्च करून 32 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत आणि 73 धावा खर्च करून 1 विकेट घेतली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये त्याने 83 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आता श्रीलंका अफगाणिस्तानची जिरवणार! पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘ही’ तगडी इलेव्हन उतरवणार
VIDEO: पाकिस्तानी संघाने केली टीम इंडियाची नक्कल! दरियादिली दाखवल्यानंतरही होत आहेत ट्रोल
आनंदी आनंद गडे! अखेर विनोद कांबळीला मिळाली नोकरी, आता थेट लाखोंमध्ये करणार कमाई