भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघ ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये एक नाव भरपूर चर्चेत होते. ते म्हणजे तामिळनाडूचा विस्फोटक फलंदाज शाहरुख खान (Shahrukh Khan). भारतीय संघात पदार्पण करण्यापासून तो अवघे काही पाऊल दूर आहे. त्याला आगामी मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
शाहरुख खानने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “मला निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यात यश आले. हेच जर मला एक वर्षांपूर्वी विचारलं असतं, मी म्हटलं असतं की, माझी या गोष्टीसाठी अजूनही तयारी नाहीये. परंतु तुम्ही जर मला आता विचारणार, तर हो मी भारतीय जर्सी परिधान करण्यासाठी तयार आहे.”
तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साई किशोर आणि शाहरुख खान यांचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या होणाऱ्या द्विपक्षीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माचा संघ कॅरेबियन संघाविरुद्ध तीन वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
धोनीला मानतो आदर्श
शाहरुख खान माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीला (Ms Dhoni) आदर्श मानतो. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ” मी एमएस धोनीला आदर्श मानतो आणि मला त्याच्या सारखच सामना समाप्त करायचा आहे. जसं धोनी भारतीय संघासाठी करायचा. मी नेहमीच धोनीकडे पाहून त्यांच्यासारखं फिनिशर व्हावं, अशी इच्छा बाळगली आहे.”
सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शाहरुख खानने तामिळनाडू संघासाठी मोलाची भूमिका पार पाडली होती. या संघाला त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अखेरच्या चेंडूवर षटकार मारून विजेतेपद मिळवून दिले होते. आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर मोठी बोली लागण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेचा मेगा ऑक्शन येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
U19 वर्ल्डकप: ‘यंग इंडिया’चा ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय; सलग चौथ्यांदा केला अंतिम फेरीत प्रवेश
भारत दौऱ्यानंतर श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, नावे आहेत २८५ विकेट्स
मेगा लिलावातून नाव मागे घेतल्यानंतर आर्चरचा यू टर्न, ‘या’ कारणामुळे बीसीसीआयने केलंय शॉर्टलिस्ट