---Advertisement---

पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे 50 धावांवर ढासळली शाहरुखची टीम, रसेल-नारायण तर सुपरफ्लॉप

Shahrukh-Khan
---Advertisement---

सध्या यूएसएमध्ये मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सहावा सामना रविवारी (दि. 16 जुलै) डलास येथे पार पडला. या सामन्यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुद्ध एमआय न्यूयॉर्क संघ आमने-सामने होते. या सामन्यात न्यूयॉर्क संघाने 105 धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील पहिला विजय होता. न्यूयॉर्क संघाच्या विजयाचा शिल्पकार टीम डेविड ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीचा असलेला नाईट रायडर्स संघाने खूपच लाजीरवाणे प्रदर्शन केले. त्यांच्या संघाचा डाव अवघ्या 50 धावांवर संपुष्टात आला.

या सामन्यात एमआय न्यूयॉर्क (Mi New York) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूयॉर्क संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 155 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (Los Angeles Knight Riders) संघाचा डाव 13.5 षटकात अवघ्या 50 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना न्यूयॉर्क संघाने 105 धावांनी आपल्या नावावर केला.

https://twitter.com/MLCricket/status/1680827075576442880

अवघ्या 50 धावांवर डाव संपुष्टात
न्यूयॉर्क संघाच्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाईट रायडर्स संघाकडून फक्त उन्मुक्त चंद यानेच दोन आकडी धावसंख्या उभारली. त्याने या सामन्यात 26 चेंडूंचा सामना करत 26 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 2 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांचाही आकडा पार करू शकला नाही. कर्णधार सुनील नारायण (Sunil Narine) या सामन्यात फक्त 2 धावा करू शकला.

हेही वाचा- महाराष्ट्राचं पोरगं चमकलं! अविनाश साबळेला मिळालं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट, लगेच वाचा

यावेळी न्यूयॉर्क संघाकडून गोलंदाजी करताना पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये नॉश्तुश केंजिगे, ट्रेंट बोल्ट, कागिसो रबाडा, एहसान आदिल आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांच्या नावाचा समावेश आहे.

टीम डेविडची विस्फोटक खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूयॉर्क संघाकडून टीम डेविड याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यादरम्यान 21 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यानेही 38 धावांचे योगदान दिले, तर सलामीवीर डेवाल्ड ब्रेविस 15 धावांवर बाद झाला. इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही.

यावेळी नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजी करताना तीन गोलंदाजांना प्रत्येकी 2 विकेट्स घेण्यात यश आले. त्यामध्ये अली खान, कॉर्ने ड्राय, ऍडम झम्पा यांचा समावेश आहे. यांच्याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन यालाही 1 विकेट घेण्यात यश आले. (shahrukh khan team los angeles knight riders all out on 50 runs against mi new york in major league cricket 2023 read more)

महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर! कर्णधार स्टोक्सने घेतला मोठा निर्णय

आयर्लंड दौऱ्यावर लक्ष्मण बनणार भारतीय संघाचा कोच; द्रविडला ब्रेक, पण कॅप्टन कोण?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---