वेस्ट इंडिज संघ फेब्रुवारी महिन्यात भारतात वनडे व टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची २६ जानेवारी रोजी घोषणा झाली होती. त्यानंतर, ३० जानेवारी रोजी या संघात तमिळनाडूचे दोन खेळाडू शाहरुख खान व साई किशोर यांना बॅकअप म्हणून सामील करण्यात आले. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शाहरुखने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्याने आगामी आयपीएल हंगामात आपल्याला कोणत्या संघात खेळायला आवडेल याविषयी खुलासा केला.
काय म्हणाला शाहरुख?
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखने आयपीएल, विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघात आपली जागा बनवली आहे. तो मागील वर्षी आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होता. मात्र, पुढील हंगामासाठी त्याला पंजाबने संघात रिटेन केले नाही. आगामी हंगामात त्याला कोणत्या संघात खेळायला आवडेल असे विचारले असता तो म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला ज्यांनी पहिली संधी दिली त्या पंजाब संघासाठीच खेळायला आवडेल. माझे राज्य असलेल्या तमिळनाडू येथील चेन्नई सुपर किंग्सने मला खरेदी केले तरी, मी त्यांच्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करील.”
आयपीएल २०२१ वेळीच्या लिलावाबाबत बोलताना शाहरुख म्हणाला,
“देशांतर्गत स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे अनेक संघांनी माझी चाचणी घेतली होती. त्यामुळे कोणता संघ विकत घेईल याबाबत खात्री नव्हती. त्यावेळी माझी मूळ किंमत २० लाख रुपये होती. मला जास्तीत जास्त ५० लाख रुपये मिळतील असे वाटलेले. मात्र मला त्याच्या जवळपास २६ पट अधिक रक्कम मिळाली. हे काहीसे अनपेक्षित होते.”
अशी राहिली आहे कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करणारा शाहरुख मागील दोन वर्षांपासून नेहमी चर्चेत आहे. त्याने आत्तापर्यंत ५० टी२० सामने खेळताना १३६ पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने ५४७ धावा काढल्या आहेत. आयपीएलमधील ११ सामन्यात त्याच्या नावे १५३ धावा आहेत. सर्व आयपीएल संघांना एक उत्कृष्ट भारतीय फिनिशर हवा असल्याने या लिलावातही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-