वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला. हा सामना वेस्ट इंडीजचा उपकर्णधार व सलामीवीर शाई होप याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. आपला शंभरावा वनडे सामना खेळत असलेल्या होपने शानदार शतक झळकावले. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
होपचे दमदार शतक
पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या होपने दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलेच रिमांडवर घेतले. त्याने पहिल्या गड्यासाठी मायर्ससह ६५ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी कर्णधार निकोलस पूरनसह त्याने ११७ धावा जोडल्या. पूरन बाद झाल्यानंतर होपने आपल्या कारकिर्दीतील १३ वे शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने आपल्या शंभराव्या सामन्यात हा कारनामा केला. त्याने १३५ चेंडूवर ८ चौकार व तीन षटकार मारत ११५ धावा केल्या.
A hundred in his 100th ODI! ????
Shai Hope completes his 13th ODI hundred in Port of Spain in the second ODI ????
Watch #WIvIND for FREE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) ???? | https://t.co/tCiz5Jjaqf pic.twitter.com/MPRC9vQl4U
— ICC (@ICC) July 24, 2022
अनेक विक्रम केले नावावर
होपने शंभराव्या वनडे सामन्यात शतक करणारा १० वा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याचे भारताविरुद्धचे हे तिसरे वनडे शतक आहे. भारताविरुद्ध तीन किंवा त्यापेक्षा अधिक वनडे शतके ठोकणारा तो चौथा कॅरेबियन फलंदाज बनला. त्याच्यापेक्षा अधिक शतके फक्त ख्रिस गेलने (४ शतके) ठोकली आहेत. तसेच पहिल्या ४५ वनडे डावात सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज तो बनला. त्याच्या नावे ११ शतके जमा आहेत. विशेष म्हणजे २०१९ पासून त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे ९ शतके झळकावली आहेत.
यजमानांची मोठी धावसंख्या
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. होपचे शतक, पूरनचे आक्रमक अर्धशतक व इतर फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर यजमान संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी ३१२ धावांचे आव्हान ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा दिग्गज म्हणतोय,”तर श्रेयसला संघाबाहेर व्हावे लागेल”
विराट नाही तर सूर्यकुमार ठरतोयं ‘या’ खेळाडूसाठी धोकादायक, भारताच्या दिग्गजाचे आश्चर्यकारक विधान
‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा






