---Advertisement---

नेतृत्व बदलले! आता टी20 आणि वनडेसाठी वेगवेगळे कर्णधार, लगेच वाचा

On: बुधवार, फेब्रुवारी 15, 2023 11:24 PM
West Indies
---Advertisement---

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने आपल्या नव्या हंगामाआधी पुरुष संघाच्या नेतृत्वात बदल केले आहेत. टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर निकोलस पूरन याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मागील जवळपास चार महिन्यांपासून विनाकर्णधार असलेल्या वेस्ट इंडीज संघाला नवीन कर्णधार लाभले. आता वनडे संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज शाई होप तर टी20 संघाचे नेतृत्व अष्टपैलू रॉवमन पॉवेल करेल.

मागील वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाची कामगिरी अत्यंत खराब झालेली त्यांना पात्रता फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला होता. यानंतर संघाचा तत्कालीन कर्णधार निकोलस पूरन याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिलेला. तेव्हापासून वेस्ट इंडीज संघाच्या मर्यादित षटकांच्या संघाला कर्णधार नव्हता.

बुधवारी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जाहीर करत नव्या कर्णधारांची नियुक्ती केली. त्यानुसार होप वनडे व पॉवेल टी20 संघाचे नेतृत्व करेल. होपने यापूर्वी कधीही वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केलेले नाही. दुसरीकडे, पॉवेल याला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये नेतृत्वाचा पुरेसा अनुभव आहे.

दोन्ही संघांची पहिली परीक्षा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होईल. होप याच्याकडे आगामी वनडे विश्वचषकासाठी संघाला पात्र करण्याची मोठी जबाबदारी असेल. तर, पॉवेलला टी20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणावे लागतील. याव्यतिरिक्त कसोटी संघाचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेट हा करतो.

 

(Shai Hope – ODI captain & Rovman Powell – T20 captain of West Indies)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना भुवी ना चहल! टी20 मध्ये बळींचे शतक बनवणारी पहिली भारतीय बनली दिप्ती  
अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? ‘या’ खेळाडूचा पत्ता कट 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---