Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? ‘या’ खेळाडूचा पत्ता कट

February 15, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shreyas-Iyer

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे ‌‌बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. उभय संघातील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होईल. या सामन्यासाठी तंदुरुस्त झालेल्या श्रेयस अय्यर याला अंतिम अकरामध्ये संधी मिळणार का? याचे उत्तर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहे.

भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज असलेला श्रेयस अय श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याने तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मेहनत घेतली. याच कारणाने तो नागपूर येथील पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. त्यानंतर आता दिल्ली कसोटीआधी तो तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तो संघात देखील सामील झाला.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी श्रेयस अय्यर याचा संघात समावेश होणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले,

“तो तंदुरुस्त झाला आहे. त्याने नेटमध्ये देखील चांगलाच घाम गाळला. तो नेटमध्ये चांगला वाटला. मात्र, आम्ही जोखीम घेणार नाही. सामन्याच्या सकाळपर्यंत आम्ही वाट पाहू. तो खेळण्यासाठी पूर्ण तयार असला तर, त्याच्या मागील कामगिरीच्या आधारे तो नक्कीच संघात पुनरागमन करेल.”

श्रेयसने मागील संपूर्ण वर्षात भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. नागपूर कसोटीत त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र, तो या सामन्यात अपयशी ठरला. त्याला या सामन्यात केवळ आठ धावा करता आल्या.

(Shreyas Iyer Might Be Include In India XI In Delhi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनली टीम इंडिया, इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडले 
नागपूर कसोटी गाजवलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा रँकिंगमध्ये बोलबाला, अश्विन-जड्डू टॉपवर


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI Women

ना भुवी ना चहल! टी20 मध्ये बळींचे शतक बनवणारी पहिली भारतीय बनली दिप्ती

Photo Courtesy: Twitter

टीम इंडियाने कायमच राखलेय दिल्लीचे तख्त! आकडेवारी वाढवतेय ऑस्ट्रेलियाचे टेन्शन

Photo Courtesy: Twitter/BCCI Womens

टीम इंडियाच्या पोरी लय भारी! वेस्ट इंडीजला पराभूत करत मिळवला दुसरा विजय, हरमन-रिचा चमकल्या

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143