बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंड संघ 77 धावांनी पराभूत झाला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 17 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेला आयर्लंड संघ अवघ्या 17 षटकांमध्ये 125 धावा करू शकला. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याने जबरदस्त प्रदर्शन केले. या प्रदर्शनाच्या जोरावर शाकिबने आपल्या नावावर एक मोठा विक्रम देखील केला.
बांगलादेश आणि आयर्लंड (Bangladesh vs Ireland) यांच्यातील हा सामना बुधवारी (29 मार्च) चट्टोग्राममध्ये खेळला गेला. शाकिब अल हसन त्याच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर सामनावीर ठरला. शाकिबने अवघ्या 4 षटकांमध्ये 22 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. या 5 विकेट्सच्या हॉलनंतर शाकिबने एक मोठा विक्रम नावावर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स आता शाकिबच्या नावावर झाल्या आहेत.
शाकिबने बुधवारी आंतरराष्ट्रीय टी-20 मधील 112 सामन्यांमधील 136 विकेट्स पूर्ण केल्या. याआधी न्यूझीलंडचा दिग्गज टिम साउदी या यादीत सर्वात वरती होती. साउदीच्या नावावर 107 सामन्यांमध्ये 134 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे, ज्याने 80 सामन्यांमध्ये 129 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर ईश सोढी आहे, ज्याने 91 सामन्यांमध्ये 114 विकेट्स घेतल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी दिग्गज लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने आपल्या टी-20 कारकिर्दीत एकूण 84 सामने खेळले आणि यामध्ये 107 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रतम गोलंदाजी घेतली. बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दास आणि रॉनी तालुकदार यांना पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. लिटन दासने 41 चेंडूत 83, तर रॉनी तालुडकर याने 44 धावांचे योगदान दिले. शाकिबने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही नाबाद 38 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात आयर्लंडसाठी कर्टिस कॅम्फर या एकट्यानेच अर्धशतक ठोकले. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद याने संघासाठी 3 विकेट्स घेतल्या. (Shakib Al Hasan became the bowler who took most T20 wickets in the world)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या दोन दिवस आधीच स्मिथची भविष्यवाणी; ‘हे’ चार संघ करतील प्लेऑफमध्ये एन्ट्री, RCB अन् MI बाहेर
ICC Rankings : राशिद खान बनला टी20चा बादशाह, आयपीएलपूर्वीच ‘या’ गोलंदाजाला पछाडत पटकावले अव्वलस्थान