वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश संघात ढाका येथे शुक्रवारी (२२ जानेवारी) दुसरा वनडे सामना पार पाडला. या सामन्यात यजमान बांग्लादेश संघाने १०० चेंडू राखून ७ विकेट्सने विजयी पताका झळकावली. अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन हा बांग्लादेशच्या विजयाच्या नायक ठरला. फलंदाजीसह गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करत शाकिबने सर्वांची मने जिंकली. सोबतच त्याने वनडे क्रिकेटमधील शानदार विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
५० षटकांच्या या वनडे सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना शाकिबने २ विकेट्स घेतल्या. १० षटकात ३० विकेट्स घेत त्याने हा पराक्रम केला. यात वेस्ट इंडिजचा फलंदाज आंद्रे मॅककार्थी आणि कर्णधार जेसन मोहम्मद यांच्या विकेटचा समावेश होता. तर वरच्या फळीत फलंदाजी करताना ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावांची खेळी केली.
यासह ३३ वर्षीय शाकिब हा वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकाच मैदानावर २५०० पेक्षा जास्त धावा आणि १०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. आजवर बांग्लादेशच्या ढाका स्टेडियमवर त्याने २५०० वनडे धावा केल्या आहेत. तर तब्बल ११९ फलंदाजांना याच मैदानावर बाद करत हा अनोखा किर्तीमान मिळवला आहे.
Shakib Al Hasan completes his 2500 ODI runs at Mirpur (Dhaka). He has also taken 119 wickets at this ground.
Only player with 2500+ runs & 100+ wickets at a particular ground in ODIs!#BANvWI #BANvsWI #WIvBAN
— Rajneesh Gupta (@rgcricket) January 22, 2021
शाकिव अल हसनची वनडे कारकिर्द
शाकिबच्या वनडे आकडेवारीविषयी बोलायचे झाले तर, आजवर त्याने एकूण २०८ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान १९६ डावात फलंदाजी करताना नाबाद १३४ धावांच्या सर्वोच्च खेळीसह ६३८५ धावा केल्या आहेत. तर २०५ डावात गोलंदाजी करताना एकूण २६६ विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश संघातील सामन्याची आकडेवारी
वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश संघात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १४८ धावा केल्या होत्या. यात रोवमन पॉवेल याच्या सर्वाधिक ४१ धावांचा समावेश होता. ६६ चेंडूत १ षटकार आणि २ चौकार मारत त्याने ही धावसंख्या गाठली होती. इतर फलंदाज २५ पेक्षा जास्त धावा करू शकले नाहीत. बांग्लादेशकडून गोलंदाजी करताना, मेहिडी हसन मिराज याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.
वेस्ट इंडिजच्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार तमीम इक्बाल याने अर्धशतकी खेळी केली. तर शाकिब अल हसननेही ४७ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिज गोलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. परिणामत ७ विकेट्सने बांग्लादेशने हा सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
हॉटेलच्या खोलीत महिला अधिकारीसोबत सापडला युवा क्रिकेटर?, श्रीलंकाच्या माध्यमांचे आरोप
युजवेंद्र चहलबद्दल ‘ती’ टिपण्णी करणे युवराज सिंगला पडले महागात, पाहा काय आहे प्रकरण