बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (shakib al hasan) सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. तो अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडताना कुठेच कमी पडत नाहीये. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये डंका वाजवणाऱ्या शाकिब अल हसनला आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) संघाने रिलीज केले होते. परंतु आगामी आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh premier league) स्पर्धेत त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
सध्या बांगलादेश प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी (११ फेब्रुवारी) फॉरच्युन बरिशल आणि मिनिस्टर ग्रुप ढाका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात देखील फॉरच्युन बरिशल संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचा जलवा पाहायला मिळाला आहे. या सामन्यात देखील त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ षटकात २१ धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. तर दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना २९ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.
हा सामना सलग पाचवा सामनावीर पुरस्कार आहे. या स्पर्धेतील गेल्या ५ सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी करत सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. टी२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी खुलाना टायगर्स संघाविरुद्ध खेळताना त्याने ४१ धावा करत गोलंदाजी करताना २ गडी बाद केले होते, चट्टोग्राम चॅलेंजर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५० धावा करत ३ गडी बाद केले होते, कॉमिला विक्टोरियंस संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५० धावा करत २ गडी बाद केले होते. तर सिलहट सनरायझर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३८ धावा करत २ गडी बाद केले होते. या सर्व सामन्यांमध्ये त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
शाकिब अल हसनची ही कामगिरी पाहता, आगामी आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर मोठी बोली लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. आता आगामी हंगामात कुठला संघ त्याला आपल्या संघात स्थान देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, घ्या जाणून एकाच क्लिकवर
टीम इंडियाची ‘फिनीक्स भरारी’! वेस्ट इंडीजचा पराभव करत ४० वर्षांपूर्वीच्या कामगिरीची केली पुनरावृत्ती
INDvsWI – टीम इंडियाचा दमदार कर्णधार! मालिका विजयासह रोहितने पाडलीये विक्रमांची रास, वाचा