बांगलादेश संघ सध्या आयर्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन चमकला. शाकिबने या सामन्यात 93 धावा कुटल्या आण अवघ्या 7 धावांमुळे त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. यादरम्यान त्याने आपल्या 7000 वनडे धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशचा केवळ दुसरा खेळाडू ठरला.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. शनिवारी (18 मार्च) आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या 7000 वनडे धावा पूर्ण केल्या. बांगलादेशसाठी वनडे फॉरमॅटमध्ये तमिम इकबाल () याने सर्वाधिक 8146 धावा केल्या आहेत. संघासाठी 7000 वनडे धावा करणारा शाकिब दुसरा खेळाडू ठरला. आयर्लंडविरुद्धच्या या पहिल्या वनडे सामन्यात शाकिबने एकूण 89 चेंडूंचा सामना केला, ज्यात 93 धावा साकारल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार मारले. शाकिबने या धावा 104.49च्या सरासरीने केल्या.
त्याव्यतिरिक्त वनडे फॉरमॅटमध्ये 7000 धावा आणि 300 विकेट्स घेणारा जगातील तिसऱ्या क्रिकेटपटूचा मान शाकिबला मिळाला आहे. एवढेच नाही त्याने ही कामगिरी पहिल्या दोघांच्या तुलनेत खूप जलद केली आहे. यापूर्वी सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनी वनडे क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 300 विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वात कमी वनडे सामन्यांमध्ये 7000 धावा आणि 300 विकेट्स घेणारे खेळाडू
शाकिब अल हसन – 228 सामने
शाहिद आफ्रिदी – 398 सामने
सनथ जयसूर्या – 445 सामने
दरम्यान, उभय संघांतील (Bangladesh Vs Ireland) या सामन्याचा विचार केला, तर आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 338 धावांपर्यंत मजल मारू शकला. यामध्ये शाकिबच्या 93 धावांसह तौहिद ह्रदोय याच्या 92 धावांचा समावेश होता.
(Shakib Al Hasan becomes just the 3rd player to score 7000 runs and pick 300 wickets in ODIs.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीसंतच वेगळंच असतं! आयपीएलसाठी पाठिंबा एका संघाला आणि जिंकण्याची प्रार्थना दुसऱ्या संघासाठी
महिला आरसीबीच्या सुमार खेळीसाठी विराट, डिविलियर्स आणि ‘हा’ दिग्गज जबाबदार? माजी गोलंदाजाचे मोठे विधान