---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामनावीर ठरलेल्या शाकिब अल हसनने केला खास विश्वविक्रम

On: सोमवार, जून 3, 2019 1:11 PM
---Advertisement---

लंडन। आयसीसी 2019 विश्वचषकात रविवारी(2 जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात द ओव्हल मैदानावर सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 21 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे.

बांगलादेशच्या या विजयात अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

शाकिबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 84 चेंडूत 75 धावांची खेळी केली. तसेच गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करमला बाद करत 1 विकेटही घेतली. मार्करम हा शाकिबची 250 वी विकेट ठरली.

त्यामुळे शाकिब सर्वात कमी वनडे सामन्यात 5000 धावा करणारा आणि 250 विकेट्स घेणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 199 वनडे सामन्यांमध्ये असा पराक्रम केला आहे. त्याने हा पराक्रम करताना अब्दुल रझाकच्या विक्रमाला मागे टाकले आहे. रझाकने 258 सामन्यात 5000 धावा आणि 250 विकेट्सचा टप्पा पार केला होता.

विशेष म्हणजे शाकिब हा वनडेमध्ये 5000 धावा आणि 250 विकेट्स घेणारा जगातील केवळ पाचवा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. याआधी असा विक्रम रझाक, शाहिद अफ्रिदी, जॅक कॅलिस आणि सनथ जयसुर्याने केला आहे.

शाकिबने आत्तापर्यंत वनडेमध्ये 199 सामन्यात 35.75 च्या सरासरीने 5792 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत 4.45 च्या इकोनॉमी रेटने 250 विकेट्स घेतल्या आहेत.

वनडेमध्ये सर्वात कमी सामन्यात 5000 धावा आणि 250 विकेट्स घेणारे क्रिकेटपटू – 

199 सामने – शाकिब अल हसन

258 सामने – अब्दुल रझाक

273 सामने – शाहिद अफ्रिदी

296 सामने – जॅक कॅलिस

304 सामने – सनथ जयसुर्या

https://twitter.com/ICC/status/1135263566519590912

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: सुलतान ऑफ स्विंग – वसीम अक्रम

विश्वचषक २०१९: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही आहे सर्वात आनंदाची बातमी

विराटने भेट दिलेली बॅट राशीद खानकडून या खेळाडूने घेतली हिरावून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment