---Advertisement---

वयाच्या ३४व्या वर्षी ‘या’ अष्टपैलूचा मोठा विक्रम, ओलांडला ५०० विकेट्स अन् १२००० धावांचा आकडा

On: सोमवार, जुलै 19, 2021 9:36 AM
---Advertisement---

जुलै १८, हा दिवस क्रिकेटशौकिनांसाठी अतिशय खास ठरला. एकीकडे कोलंबोमध्ये श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात पहिलावहिला वनडे सामना झाला. दुसरीकडे हरारेमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात बांगालादेशचा ३४ वर्षीय शाकिब अल हसन याने अष्टपैलू खेळ केला. यासह त्याने मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने ९ विकेट्स गमावत २४० धावा केल्या होत्या. दरम्याव शाकिबने १० षटके गोलंदाजी करताना ४२ धावा देत २ विकेट्स चटकावल्या होत्या. झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक रेगिस चाकाब्वा याला त्याने त्रिफळाचित केले होते. त्यानंतर डियान मायर्सला झेलबाद केले होते.

गोलंदाजीतील दमदार कामगिरीनंतर त्याने फलंदाजीतही संघासाठी बहुमुल्य कामगिरी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने नाबाद ९६ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. १०९ चेंडूंचा सामना करताना ८ षटकाराच्या मदतीने त्याने ही खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे बांगालादेशने ४९.१ षटकातच ३ विकेट्स राखून झिम्बाब्वेचे २४१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते.

२ विकेट्स आणि ९६ धावांच्या अष्टपैलू कामगिरीसह शाकिबने मोठा विक्रम नोंदवला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात (वनडे, टी२० आणि कसोटी) ५०० पेक्षा जास्त विकेट्स आणि १२००० पेक्षा जास्त धावा करणारा केवळ दुसरा अष्टपैलू ठरला आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५८३ विकेट्स घेतल्या आहेत. तर फलंदाजीमध्ये १२०७० धावा चोपल्या आहेत.

शाकिबपुर्वी केवळ दक्षिण आफ्रिकाचा माजी अष्टपैलू जॅक्स कॅलिस हा किर्तीमान करू शकला आहे. त्याने ५७७ विकेट्स आणि २५५३४ धावांसह हा मानाचा तुरा त्याच्या शिरपेचात नोंदवला होता.

शाकिब अल हसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
शाकिबच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत सर्वाधिक वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत त्याने २१४ वनडे सामने खेळले आहेत. त्याबरोबरच ७६ टी२० आणि ५८ कसोटी सामने खेळले आहेत. अशाप्रकारे त्याने आतापर्यंत ३३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कुलचा’ जोडीचे धमाकेदार पुनरागमन, एकाने पहिल्याच चेंडूवर धाडले तंबूत; दुसऱ्याच्या ४ चेंडूत २ विकेट्स

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असा’ अद्भुत विक्रम, तिन्ही स्वरुपात ३ खेळाडूंचे षटकारासह पदार्पण

‘द्राविड उत्कल वंग’; राष्ट्रगीतातील हे बोल सुरू होताच द्रविडकडे फिरला कॅमेरा, भारतीयांची अभिमानाने फुगली छाती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---