---Advertisement---

‘कुलचा’ जोडीचे धमाकेदार पुनरागमन, एकाने पहिल्याच चेंडूवर धाडले तंबूत; दुसऱ्याच्या ४ चेंडूत २ विकेट्स

On: सोमवार, जुलै 19, 2021 9:02 AM
---Advertisement---

रविवारी (१८ जुलै) भारत विरुद्ध श्रीलंका या संघांमध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकहाती विजय मिळवत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाची फिरकी जोडी ‘कुल-चा’ला देखील संधी देण्यात आली होती. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांनी या सामन्यातून जोरदार पुनरागमन केले आहे.

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन वर्षानंतर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही फिरकी जोडी एकत्र मैदानात उतरली होती. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही फ्लॉप ठरत होते. त्यामुळे या सामन्यात दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या जोडीनेही चाहत्यांना निराश केले नाही. दोघांनीही २-२ गडी बाद करत जोरदार पुनरागमन केले आहे. (Tremendous comeback of kuldeep yadav and yuzvendra chahal in team india sent the batsman out on the mystery ball watch video)

https://twitter.com/SanProsperity/status/1416714632471875588?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416714632471875588%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fsl-vs-ind-tremendous-comeback-of-kulcha-kuldeep-yadav-and-yuzvendra-chahal-in-team-india-sent-the-batsmen-out-on-the-mystery-ball-watch-viral-video-hindi-2489299

सर्वात आधी चहलने आपल्या पहिल्या चेंडूवर अविष्का फर्नांडोला बाद करत श्रीलंका संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने एकाच षटकात २ फलंदाजांना माघारी धाडत श्रीलंका संघाला बॅकफूवरवर नेले होते. कुलदीपने १७ व्या षटकात आधी भानूका राजपक्षेला पहिल्या चेंडूवर २४ धावांवर माघारी धाडले; तर षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने मिनोडला बाद केले होते. यानंतर चहलने श्रीलंकेचा कर्णधार दानुस शनाकाला हार्दिक पंड्याच्या हातून झेलबाद केले होते. ही जोडी फॉर्ममध्ये आल्यामुळे भारतीय चाहत्यांच्या जीवात जीव आला असेल.

कुलदीप यादव हा आधी सारखी गोलंदाजी करताना दिसून येत आहे. तो फ्लाईट चेंडू टाकून फलंदाजांना अडकवण्याच्या प्रयत्नात होता. सोशल मीडियावर कुलदीप यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजपक्षे कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद होताना दिसून येत आहे. हा अप्रतिम झेल कर्णधार शिखर धवनने टिपला आहे.

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत होता. प्रथम फलंदाजी करताना त्यांना ५० षटक अखेर ९ बाद २६२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी केली होती. तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या इशान किशनने पदार्पणाच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावत ५९ धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ३६.४ षटकात ७ गडी शिल्लक असताना आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असा’ अद्भुत विक्रम, तिन्ही स्वरुपात ३ खेळाडूंचे षटकारासह पदार्पण

‘द्राविड उत्कल वंग’; राष्ट्रगीतातील हे बोल सुरू होताच द्रविडकडे फिरला कॅमेरा, भारतीयांची अभिमानाने फुगली छाती

भारतीय दिग्गज नवजोत सिंग सिद्धू बनले पंजाबचे नवे ‘कॅप्टन’, सोनिया गांधींकडून शिक्कामोर्तब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---