बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने इंग्लंडचा माजी महान खेळाडू इयान बाॅथमचा मोठा विक्रम मोडला आहे. त्याने हा विक्रम बांगलादेश विरुद्ध विंडीज कसोटी सामन्यात केला.
शाकिबने कसोटीत जलद ३००० धावा आणि २०० विकेट घेणारा गोलंदाज बनण्याचा विक्रम केला आहे.
त्याने केवळ ५४ कसोटीत हा विक्रम केला आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ३४ तर दुसऱ्या डावात १ धाव केली. तसेच गोलंदाजीत दोन्ही डावात मिळून ५ विकेट्स घेतल्या.
यामुळे त्याच्या नावावर आता ५४ सामन्यात ३७३७ धावा आणि २०१ विकेट्स झाल्या आहेत. यापुर्वी हा विक्रम इयान बाॅथमच्या नावावर होता. त्यांनी ५५ कसोटीत हा पराक्रम केला होता.
कसोटीत जलद ३००० धावा आणि २०० विकेट्स घेणारे गोलंदाज-
५४- शाकिब अल हसन
५५- इयान बाॅथम
५८- ख्रिस क्रेन्स
६९- अॅड्रू फ्लिंटाॅफ
७३- कपील देव