बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्या अडचणी वाढल्या आहेत. एका हत्याप्रकरणात शाकिबचे नाव जोडले जात असून मायदेशात परतल्यानंतर त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान बांगलादेशचा सर्वात यशस्वी क्रिकेटपटू आणि माजी खासदार शाकिबला मायदेशी परतल्यावर त्याच्या सुरक्षेची भीती वाटत आहे. भारत दौऱ्यानंतर बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी शाकिबने बोर्डाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
भारत दौरा संपल्यानंतर बांगलादेशला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
तत्पूर्वी कानपूर कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शाकिब म्हणाला, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खेळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट असोसिएशनने (बीसीबी) मला परदेशात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग दिला, तरच मी तिथे खेळेन. कारण बांगलादेशातील परिस्थिती वेगळी आहे. परंतु बोर्ड मला सुरक्षा पुरवू शकत नसेल तर तिथे जाणे अवघड आहे.
शाकिबवर अनेक गुन्हे दाखल आहेत
बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली. पण त्याआधी शाकिब हा शेख हसीना सरकारच्या आवामी लीगचा खासदार होता. विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका व्यक्तीने शाकिबसह 156 लोकांवर आपला मुलगा रुबेलच्या हत्येचा आरोप केला आहे.
अशा परिस्थितीत बांगलादेशात पोहोचताच शाकिबला अटक होण्याची भीती आहे. शाकिबची पत्नी अमेरिकन नागरिक असून बीसीबीकडून त्याला कोणतेही आश्वासन न मिळाल्यास तो भारतातून थेट अमेरिकेला जाऊ शकतो.
याबाबत बोलताना शाकिब म्हणाला, बांग्लादेशी नागरिक असल्याने भारतातून अमेरिकेला जाण्यात कोणतीही अडचण नाही. पण बांगलादेशात पोहोचल्यानंतर मी बाहेर पडू शकेन की नाही? माहिती नाही. बांगलादेशातील परिस्थितीबद्दल मी माझ्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून जे काही ऐकत आहे त्यावरून मी थोडासा साशंक आहे, असे मत शाकिबने मांडले आहे.
हेही वाचा-
“पंत उत्कृष्ट खेळाडू, तो ऑस्ट्रेलियासाठी खेळायला हवा होता”, मार्शकडून कौतुकाचा वर्षाव
रिषभ पंतची आरसीबीच्या कर्णधारपदावर नजर? यष्टीरक्षकाने सर्वकाही खरं सांगून टाकलं
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!