बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना घरच्या मैदानावरील चाहत्यांसमोर खेळण्यासाठी सज्ज झाला असून सोमवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी बांगलादेश संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
कानपूरमधील भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) शाकिबच्या सुरक्षिततेची खात्री करून दिल्यास, शाकिबने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर आपली शेवटची कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. शाकिबवर एका विद्यार्थ्याच्या हत्येचा आरोप आहे, मात्र बांगलादेशचा दिग्गज खेळाडू घटनेच्या वेळी कॅनडातील टी20 लीगमध्ये सामील झाला होता.
शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) बांगलादेशच्या चाहत्यांना एक संदेश दिला. त्याने लिहिले, “तुम्हा सर्वांना माहित आहे की, मी लवकरच माझा शेवटचा सामना खेळणार आहे. मला तुम्हा सर्वांचा निरोप घ्यायचा आहे. निरोपाच्या क्षणी, मला त्यांच्याशी हस्तांदोलन करायचे आहे. ज्यांच्या टाळ्यांनी मला अधिक चांगले खेळण्याची प्रेरणा दिली.”
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), झाकीर अली, मेहंदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.
हेही वाचा-
IND vs NZ; कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘हा’ रेकाॅर्ड मोडणे रोहित शर्मासाठी कठीण!
PAK vs IND; “ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास…” पाकिस्तान कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IPL 2025; 15 चेंडूत अर्धशतक ठोकलेल्या ‘या’ स्टार खेळाडूवर दिल्ली खरचणार कोट्यवधी रूपये