बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसन हा नेहमी चर्चेत असतो. त्याच्याशी अनेक वादही जोडले गेले आहेत. आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड व शाकिब हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या नव्या वादामुळे शाकिबवर पुन्हा एकदा बोर्डाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
शाकिबने नुकतेच एका ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीशी करार करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्याला यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्ड परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. बोर्डाने अधिकृतरित्या हे स्पष्ट केले आहे की, शाकिबला आम्ही त्या कंपनीची जाहिरात करण्यास मनाई करू. तसेच नजीकच्या काळात त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट देखील पाहू.
बांगलादेशमधील कायद्यानुसार, सट्टेबाजीवर कडक प्रतिबंध लावले गेलेत. त्यामुळे सट्टेबाजीला प्रोत्साहन देणे हे देशाच्या संविधानाच्या विरोधातील गोष्ट आहे, असे बोलले जातेय. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमूल हसन यांनी म्हटले,
“आम्ही शाकिबला त्या कंपनीसोबत कराराची परवानगी देणारच नाही. त्याने आमच्याकडे याबाबत कोणतीही परवानगी मागितली नव्हती. तसेच त्याने खरंच हा करार केला आहे का हे देखील एकदा पडताळून पहावे लागेल. आमच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला. कोणालाही तो असे करेल हे वाटत नव्हते. मात्र, त्यांनी ही गोष्ट केली असेल तर त्याला विचारणा केली जाईल. त्याला कायदेशीर नोटीसही पाठवू. आम्हाला सट्टेबाजीशी कोणताही संबंध ठेवायचा नाही.”
हसन पुढे म्हणाले,
“बोर्डातील काही सदस्यांना वाटते की, त्याने कराराची घोषणा केलेले पोर्टल हे सट्टेबाजासाठी वापरले जाते. यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग नाही. मात्र, सर्व गोष्टींची माहिती ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. आमच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे.”
यापूर्वी एकदा शाकिबवर सट्टेबाजाशी संपर्क साधण्याच्या कारणाने दोन वर्षाची बंदी आयसीसीने लादली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…
संपुर्ण यादी: कॉमन वेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पटकावलेल्या २० मेडल्सची यादी
मियामी बीचवर भारतीय खेळाडू करतायत भलताच एन्जॉय!, पाहा भारतीय ‘तिकडी’चे व्हायरल होणारे फोटो






