बांगलादेश क्रिकेट संघाला आगामी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी नवा कर्णधार मिळाला आहे. वनडे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल याने अचानक राजीनामा दिल्यानंतर, आता अनुभवी अष्टपैलू व माजी कर्णधार शाकिब अल हसन हा संघाचे नेतृत्व करेल. याबाबतची अधिकृत घोषणा नुकतेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आली.
तमिम इक्बालने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आणि लगेच काही वेळात त्याने आपला निर्णय मागे घेतला. मात्र, त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत वनडे संघाचे कर्णधारपद रिक्त झाले होते. त्यानंतर आता बोर्डाने शाकिबकडे नेतृत्व दिले. शाकिब यापूर्वी बांगलादेशच्या कसोटी आणि टी20 संघाचा कर्णधार आहे. तसेच याआधी 2011 च्या वनडे विश्वचषकात शाकिबने बांगलादेशचे संघचे नेतृत्व केले होते.
तमिम यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील कर्णधार कोण होणार यासाठी शाकिबसह सलामीवीर लिटन दास व अष्टपैलू मेहदी हसन मिराज यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, अनुभवाच्या जोरावर शाकिब याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले.
बांगलादेश संघ आगामी आशिया चषक व विश्वचषक या दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. 2019 वनडे विश्वचषकात बांगलादेश संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. तर, 2018 वनडे आशिया चषकात भारतीय संघाने त्यांना अंतिम फेरीत पराभूत केले होते.
(Shakib Al Hasan Lead Bangladesh Cricket Team In Asia Cup And ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली का खेळत नाही T20 क्रिकेट? कर्णधार रोहितने सांगूनच टाकले कारण, वाचाच!
रोहितलाच नाही स्वतःच्या निवडीची गॅरंटी! म्हणाला, “प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल”