बांगलादेशचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने मंगळवारी (30 ऑगस्ट) अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया चषक 2022च्या सामन्यात चार षटकांत 13 धावांत 1 बळी घेतला. त्याने रहमानउल्ला गुरबाजला आपला शिकार बनवले. त्यानंतर त्याच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रमाची नोंद झाली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरलेल्या सामन्यात 300 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याच्या खालोखाल फक्त श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे, ज्यांच्या नावावर पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये 370 विकेट्स आहेत. शाकिबने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 631 विकेट घेतल्या आहेत. त्यापैकी बांगलादेशचा संघ पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये त्याने 300 बळी घेतले आहेत. याशिवाय वसीम अक्रम, चामिंडा वास आणि जेम्स अँडरसनचाही या यादीत समावेश आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 9 चेंडू राखून 3 विकेट्स गमावून विजय मिळवला. या सामन्यात खासकरून अफगाणिस्तानचे दोन फिरकीपटू राशिद खान आणि मुजीब अल रहमान या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत अफगाणिस्तानला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. विशेष म्हमजे नाणेफेक जिंकूनप्रथम गोलंदाजीचा सोपा पर्याय असतानाही शाकिब अल हसनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने त्याला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
हरलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतले
370 – एम मुरलीधरन
300 – शकिब अल हसन*
274 – वसीम अक्रम
272 – चामिंडा वास
270 – जेम्स अँडरसन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच
‘मध्यंतरी मी मेल्याच्याही बातम्या आल्या होत्या…’, पत्रकाराला मिळाले भारतीय खेळाडूकडून भन्नाट उत्तर
‘हाँगकाँगचा बाबर’ भारतासाठी ठरणार कर्दनकाळ! नावावर आहे मोठा विक्रम, रोहितही नाही आसपास