चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पाचवा सामना मंगळवारी(१३ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याआधी कोलकाता संघाकडून शाकिब अल हसनला खास कॅप (टोपी) प्रदान करण्यात आली. याबद्दल आयपीएलच्या ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे.
ब्रेंडन मॅक्यूलमच्या हस्ते देण्यात आली कॅप
मंगळवारी सामना सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमने शाकिबला खास कॅप प्रदान केली. ही कॅप प्रदान करण्यामागील कारण असे की शाकिब कोलकातासाठी ५० वा सामना खेळत आहे. त्यामुळे त्याबद्दल त्याचा सन्मान कोलकाता संघाकडून करण्यात आला.
https://twitter.com/IPL/status/1381961739701346307
शाकिबला मिळाली मोठी रक्कम
बांगलादेशचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असलेला २०१८ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झाला. त्याच्यावर कोलकता नाईट रायडर्सने ३.२० कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात सामील करुन घेतले होते.
विशेष म्हणजे शाकिबलने आपल्या आयपीएल कारकिर्तीची सुरुवात कोलकाता संघातूनच केली होती. तो २०११ सालापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तसेच साल २०१२ व २०१४ या हंगामाचे विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाचा देखील तो भाग होता. पण त्याला २०१८ साली सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या संघात घेतले होते. पण त्यांनी त्याला आयपीएल २०२१ लिलावाआधी संघातून मुक्त केले. त्यानंतर तो पुन्हा केकेआर संघाचा भाग झाला.
शाकिबची कारकिर्द
शाकिबने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ६५ सामने खेळले असून ७४९ धावा केल्या असून ६१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दुखापतींपासून वाचण्यासाठी ‘हिटमॅन’ करतोय ‘हे’ काम, स्वत:च केला खुलासा
राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यातील चालू सामन्यात अचानक चेंडू झाला निळा, ‘हे’ होते कारण
‘तेव्हा रिचर्डसन मला शाळकरी मुलासारखा वाटला होता’, भारतीय दिग्गजाने सांगितली मजेशीर आठवण





