Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाकिबला व्हायचेच ‘नायक’चा अनिल कपूर! म्हणला, “एका दिवसात सगळं बदलेल”

January 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC/Youtube

Photo Courtesy: Twitter/ICC/Youtube


प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याचा नायक हा चित्रपट तुफान लोकप्रिय आहे. जवळपास वीस वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाचा चाहता वर्ग अजूनही दिसून येतो. एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाल्यानंतर, धडाडीने निर्णय घेत तो अनेक गोष्टी बदलून दाखवतो. आता त्यापासूनच प्रेरणा घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा देखील बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) बदलण्यासाठी इच्छुक आहे.

बीपीएलच्या पुढील हंगामाची लवकरच सुरुवात होईल. त्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत शाकिब अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसला. तुला बीपीएलचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनवल्यानंतर तू काय करशील? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,

“मला खरेच हि जबाबदारी दिली तर सर्व काही ठीक करण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा काळ लागेल. तुम्ही नायक चित्रपट पाहिला असेल तर समजून जा की, सगळे काही ठीक करण्यासाठी एक दिवस ही पुरेसा असतो. मी खेळाडूंचा ड्राफ्ट योग्य वेळी करेल. तसेच, स्पर्धाही अशा वेळीच आयोजित करेल जेव्हा इतर कोणत्या लीग खेळल्या जात नसतील.”

शाकिबने बीपीएलमध्ये मिळत असलेल्या असुविधेबद्दलही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला,

“बीपीएल कोणत्याही पद्धतीने बांगलादेशमधील सर्वात मोठी स्पर्धा वाटत नाही. इथे खेळाडूंची जर्सी देखील अद्याप नसल्याचे मला समजले. याव्यतिरिक्त ढाका प्रीमियर लीग अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असते. इथे काय सुरू असते हे कोणालाच माहित नसते.”

शाकिब हा बांगलादेशचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू मानला जातो. त्याला जगभरात विविध टी20 लीग खेळण्याचा अनुभव आहे. आगामी आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

(Shakib Al Hasan Want Become Nayak Movie Anil Kapoor)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान…
पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीत मारिन चिलीचचा उपांत्यपुर्व फेरीत दिमाखात प्रवेश


Next Post
Steve Smith

AUSvSA: थोडक्यात वाचला सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मिथने गमावली सुवर्णसंधी

sam curran

सॅम करनला विमान कंपनीने अचानक दिला दगा, 'या' कारणास्तव विमानात नाही मिळाली जागा

Kedar Jadhav

शर्यत अजून संपलेली नाही! तीन वर्षांनी पुनरागमन करत केदारची वादळी 283 धावांची खेळी; महाराष्ट्र...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143