बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आणि संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन यांच्यात राष्ट्रीय संघाकडून खेळण्याबाबत सुरू असलेल्या वादावर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बोर्डाने शाकिब अल हसनला ३० एप्रिलपर्यंत सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ शाकिब १२ मार्च ते ८ एप्रिल या दरम्यान होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी होणार नाही. बीसीबीने शाकिबच्या बदली खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळ वनडे संघ त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.
मागील आठवड्यात शाकिबने शारीरिक आणि मानसिक स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेण्याचे संकेत दिले होते. त्याने भविष्यासाठी आपल्या खेळाचे व्यवस्थापन करण्याकरिता दीर्घकालीन योजना आवश्यक असल्याचे म्हटले होते. नुकत्याच संपलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेनंतर तो म्हणाला होता की, “या मालिकेत मला प्रवासी असल्यासारखे वाटले. मर्यादित षटकांच्या या मालिकांत त्याने तीन एकदिवसीय आणि दोन टी२० सामन्यांमध्ये ७४ धावा केल्या होत्या. तसेच, सात बळीही मिळवलेले. त्याने मला कोणत्याही युवा क्रिकेटपटूची जागा अडवायची नाही, असे वक्तव्य केलेले.
कसोटी क्रिकेट खेळण्यास दिलेला नकार
शाकिब हा बांगलादेश संघाचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून ओळखला जातो. त्याने काही दिवसांपूर्वी देशासाठी खेळणे प्राथमिकता आहे असे सांगितले होते. याच कारणाने त्यावर आयपीएलमध्ये देखील बोली लागली नाही. तसेच, त्याने पुढील काही दिवस कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याबाबत बोलताना सांगितले होते की, पुढील एका वर्षात आपल्याला दोन विश्वचषक खेळायचे आहेत. त्यासाठी तंदुरुस्ती व तयारी व्हावी म्हणून हा निर्णय घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)
नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात (mahasports.in)