---Advertisement---

शमी आणि भुवनेश्वरला टीम इंडियात पुनरागमनासाठी ‘ही’ गोष्ट करावी लागणार! माजी खेळाडूचा मोलाचा सल्ला

On: गुरूवार, ऑगस्ट 6, 2026 7:43 PM
---Advertisement---

टीम इंडियाला (Team india) पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या यजमानपदाखाली 2027 (ODI WC 2027) चा विश्वचषक खेळायचा आहे. भारतीय संघाने यासाठी तयारी आतापासूनच सुरू केली आहे. तत्पूर्वी, मोहम्मद शमी (Mohmmed Shami & Bhuvneshwar Kumar) आणि भुवनेश्वर कुमार सध्या टीम इंडियापासून दूर आहेत. जरी या दोन्ही गोलंदाजांकडे विश्वचषक खेळण्याचा मोठा अनुभव असला, तरी सध्या संघात पुनरागमन करण्याचे मार्ग त्यांच्यासाठी बंद आहेत. मात्र, आता एका माजी भारतीय क्रिकेटपटूने शमी आणि भुवीला संघात पुनरागमन करण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash chopra on Bhuvi and Shami) यांच्या मते, शमी आणि भुवी यांनी रणजी ट्रॉफी आणि लाल चेंडूच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे. त्यांनी असेही म्हटले की, शमीने मागील रणजी हंगामात 37 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु आयपीएलमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती.

ते म्हणाले, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळणे सोपे नसते. केवळ विश्वचषकच नाही, तर स्पर्धेच्या एक वर्ष आधीपासून प्रत्येक वनडे (ODI) सामन्यात खेळावे लागते. तुम्हाला आतापासूनच खेळायला सुरुवात करावी लागेल. शमीच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो, जरी त्याने रणजी ट्रॉफी खेळून 37 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच, आता तो दुलीप ट्रॉफी (Dulip trophy) देखील खेळणार आहे. त्यामुळे शमीची बाजू थोडी मजबूत वाटते, पण वस्तुस्थिती अशी आहे की, जर आयपीएलमधील कामगिरीची तुलना केली, तर भुवनेश्वर कुमार या बाबतीत त्याच्या पुढे आहे.

ते पुढे म्हणाले की, एक गोष्ट भुवीच्या विरोधात जाते. ती म्हणजे, जेव्हा तुम्ही रणजी ट्रॉफी खेळत नाही, तेव्हा तुमचा वर्कलोड मर्यादित होतो. विजय हजारे (Vijay Hazare Trophy) ट्रॉफीमध्ये मोजकेच सामने असतात. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात 10 षटके गोलंदाजी आणि 50 षटके क्षेत्ररक्षण करावे लागते. हा खूप मोठा वर्कलोड असतो.

सध्या भारतीय संघात युवा वेगवान गोलंदाजांना संधी दिली जात आहे. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापन या खेळाडूंवर मोठा विश्वास दाखवत आहे. अशा परिस्थितीत हे युवा गोलंदाज 2027 च्या विश्वचषकासाठी निवडले जातात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---