---Advertisement---

निवृत्तीनंतर अजिंक्य राहाणे पुन्हा मैदानात! कोचिंग-समालोचन सोडून निवडला ‘हा’ वेगळा मार्ग

On: शुक्रवार, ऑगस्ट 7, 2026 10:06 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो समालोचन करणार की प्रशिक्षण देणार? अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. पण तो यापैकी काहीही करणार नाही. तो अजूनही प्रोफेशनल क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार आहे. आता रहाणे युरोपियन टी-20 लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे.

युरोपियन टी-20 प्रिमियर लीग स्पर्धेला येत्या 26 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत अजिंक्य रहाणे देखील खेळताना दिसून येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असलेला रहाणे या स्पर्धेत मार्की खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. या स्पर्धेत तो एम्स्टर्डम फ्लेम्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. हे या स्पर्धेचं पहिलंच हंगाम असणार आहे.

एम्स्टर्डम फ्लेम्सकडून शुक्रवारी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे की, अजिंक्य रहाणे युरोपियन टी-20 प्रिमियर लीग स्पर्धेत एम्स्टर्डम फ्लेम्स संघासोबत मार्की प्लेअर म्हणून जोडला जाणार आहे. रहाणेसह भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन देखील या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. यासह आणखी काही माजी भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. युरोपियन क्रिकेट संघातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे.

अजिंक्य रहाणेने काही दिवसांपू्र्वी भावुक व्हिडीओ शेअर करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. रहाणेकडे भारतासाठी 85 कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. यासह 90 वनडे आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे रहाणेसारखा अनुभवी खेळाडू संघात असणं ही एम्स्टर्डम फ्लेम्स संघासाठी आनंदाची बाब आहे.

यादरम्यान माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ ने देखील रहाणेचं कौतुक केलं. ते म्हणाले, “अजिंक्य रहाणेकडे ते सर्वकाही आहे, जे एका प्रोफेशनल क्रिकेटपटूकडे असायला हवं. स्किल्स, लवचिकता, विनम्रता आणि लीडरशीप. आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान त्याने खूप नाव कमावलं आहे. मी स्वत: पाहिलं आहे की, दबावात असतानाही तो किती शांत राहतो.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---