---Advertisement---

Video: शमीच्या शानदार इनस्विंगवर चकला बर्न्स, यष्ट्या झाल्या उध्वस्त

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 6:33 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. इंग्लंडने ४२ षटके अन् १२० धावांपासून पुढे खेळास सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशीचा पहिला अर्धा तास यशस्वीरित्या खेळून काढल्यानंतर मोहम्मद शमीने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. शमीने इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्सचा एका शानदार चेंडूने त्रिफळा उडवला. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शमीचा शानदार चेंडू
इंग्लंडचा सलामीवीर हसिब हमीद व रॉरी बर्न्स यांनी पहिल्या दिवसाखेर १२० धावा बनविल्या होत्या. दुसऱ्या दिवशी अर्धा तास त्यांनी पुन्हा एकदा भक्कमपणे किल्ला लढवला. इंग्लंडच्या डावातील ५० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद शमीने रॉरी बर्न्सचा त्रिफळा उडवला. शमीने काहीसा पुढे टाकलेला चेंडू थोडा इनस्विंग होत यष्ट्यांवर जाऊन आदळला. बर्न्सने ६१ धावांचे योगदान दिले. हमिद-बर्न्स जोडीने पहिल्या गड्यासाठी १३५ धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या दिवशी भारताचे पुनरागमन
पहिल्या दिवसावर पूर्णपणे इंग्लंडने वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या सत्रात पुनरागमन केले. शमीने बर्न्स तर जडेजाने हमीदला त्रिफळाचीत करत इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात २६ षटके खेळून काढत केवळ ६२ धावा बनवल्या. इंग्लंडकडे सध्या १०४ धावांची आघाडी आहे.

पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व
लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने वर्चस्व गाजवले. जेम्स अँडरसन व क्रेग ओव्हरटन यांच्या प्रत्येकी तीन तर, सॅम करन व ओली रॉबिन्सन यांच्या प्रत्येकी दोन बळींच्या जोरावर इंग्लंडने भारताचा पहिला डाव ७८ धावांवर संपविला. भारतासाठी सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्यानंतर हसिब हमीद व रॉरी बर्न्स यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद १२० धावांची सलामी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

ENGvIND, 3rd Test, 2nd Day Live: दिवसाच्या पहिल्याच षटकात जडेजाला मोठे यश, हमीद त्रिफळाचीत; इंग्लंडकडे ८१ धावांची आघाडी

वयाच्या चाळिशीत असूनही अँडरसनपुढे फलंदाजांच्या होतायत बत्त्या गुल, ‘हे’ आहे त्याच्या गोलंदाजीचे रहस्य

सात धावांवर बाद होऊनही विराटची आणखी एका विक्रमाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---