---Advertisement---

‘देशाचे नाव बदला!’ शमीच्या पत्नीची पंतप्रधानांकडे वादग्रस्त मागणी

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 9:35 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी शमी व हसीन यांच्यातील वाद सोशल मिडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. वादांशी नेहमी जवळचे नाते असणाऱ्या हसीनने भारत देशाच्या नावावरून एक मोठे वक्तव्य केले आहे.

हसीन जहॉंने आपल्या इंस्टाग्रामवरून म्हटले, आपल्या देशाचे नाव हे भारत किंवा हिंदुस्थान असेच असावे, देशाला इंडिया असे संबोधले जाऊ नये, असे आवाहन तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केले आहे. या अजब मागणीमुळे ती पुन्हा चर्चेत आहे.
भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदात देशाला इंडिया किंवा भारत संबोधलं जाईल असं म्हटलं आहे. तरीही शमीच्या बायकोने इंडिया हे नाव हटविण्याची मागणी केली आहे.

https://www.instagram.com/reel/ChMOXwhASyb/?igshid=YmMyMTA2M2Y=

हसीन जहॉं आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. २०१८ मध्ये दोघांमध्ये वाद झालेला. हसीन जहाँने शमी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. शमी आणि हसीन यांनी २०१४ मध्ये लग्न झाले होते. २०१८ मधील वादानंतर तिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. हसीन सातत्याने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

भारतीय संघासाठी अनेक वर्षापासून खेळत असलेला शमी मागील काही काळापासून टी२० संघातून बाहेर आहे. आगामी आशिया चषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तसेच, टी२० विश्वचषकासाठीही त्याची संघात निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बाबर आझमचं टेन्शंनं वाढलंय! पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी ‘या’ देशाने जाहिर केलाय मजबूत संघ

वेगाचा बादशहा नॉर्किएला मिळाला नवा संघ; युवा प्रिटोरियसचेही उजळले नशीब

रिषभ-उर्वशी वाद| पंतची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत; आता म्हणतोय…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---