---Advertisement---

मैदानावर कुणी घेतला रोहित शर्माचा मुका? ‘हिटमॅन’नं पुढे काय केलं? पाहा VIDEO

On: सोमवार, एप्रिल 22, 2024 5:05 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 चा 38 वा सामना सोमवारी (22 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील.

या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांचा एक मनोरंजक व्हिडिओ समोर आला. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितला बॉन्ड यांनी चक्क किस करण्याचा प्रयत्न केला! न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड हे मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत.

मुंबई इंडियन्सनं रोहित आणि बॉन्ड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘काही बाँड्स अनमोल असतात.’ व्हिडिओमध्ये रोहित मैदानात उभा असल्याचं दिसतं. फिरकीपटू आर अश्विनही त्याच्या जवळ उभा असतो. अचानक बॉन्ड रोहितच्या मागून त्याच्या जवळ येतात आणि त्याच्या गालाचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून रोहितला धक्का बसतो, मात्र त्यानंतर तो हसायला लागतो. हे पाहून अश्विनही हसायला लागतो.

रोहित आणि बॉन्ड यांच्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. चाहते दोघांचीही खूप मजा घेत आहेत. एका यूजरनं कमेंट बॉक्समध्ये लिहिलं, “भाऊ, रोहितला सुरक्षित राहावे लागेल.” दुसऱ्यानं लिहिलं, “भाऊ, काय चाललं आहे, रोहित घाबरला होता.” तिसरा म्हणाला, “यांच्या ब्रोमांन्सला तोड नाही.”

 

आयपीएलच्या चालू हंगामात मुंबई आणि राजस्थान दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. 1 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर जेव्हा दोघांमध्ये सामना झाला तेव्हा राजस्थाननं मुंबईवर 6 विकेटनं विजय मिळवला होता. राजस्थाननं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई सातव्या स्थानावर आहे. मुंबईनं 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलच्या झगमगाटापासून दूर ‘या’ भारतीय खेळाडूनं कौंटी क्रिकेटमध्ये ठोकलं नाबाद द्विशतक

“ना फलंदाजीत, ना गोलंदाजीत, त्याचा संघात काहीच उपयोग नाही”; सेहवागनं घेतला सॅम करनचा क्लास

“मी छाती ठोकून सांगतो तो नॉट आऊट आहे”, विराट कोहलीच्या वादग्रस्त विकेटवर नवज्योत सिंग सिद्धूची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---