---Advertisement---

“भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य

On: सोमवार, फेब्रुवारी 1, 2021 11:52 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवत इतिहास रचला. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार करावे अशी मागणी सुरू झाली आहे. आता या विषयावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन लीने प्रतिक्रिया दिली. भारतीय खेळाडू विराट कोहलीकडून सल्ला घेण्यास घाबरतात, असे त्याने म्हटले. शेन हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली याचा भाऊ आहे.

खेळाडू विराटला घाबरतात

ऑस्ट्रेलियासाठी ४५ वनडे सामने खेळलेल्या शेन लीने एका मुलाखतीत भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारांविषयी आपली मते व्यक्त केली. तो म्हणाला, “रहाणे माझा कर्णधार असेल. कोहली हा आतापर्यंतचा एक महान फलंदाज आहे. मला वाटते की, तो संघातील खेळाडूंसाठी सन्माननीय आहे. त्यामुळे, खेळाडू त्याचा सल्ला घेण्यास घाबरतात. तो संघात पूर्ण व्यावसायिक खेळाडूंची मागणी करतो. त्यामुळे खेळाडूंना फिट राहावे लागते. संघातील खेळाडू मैदानावर उत्तम प्रदर्शन करतात पण ते थोडेसे घाबरलेले दिसतात.”

रहाणेकडे सोपवावे नेतृत्व

शेन ली पुढे म्हणाला की, “रहाणेच्या नेतृत्वात संघ अगदी निवांत दिसत असतो. संघाने त्याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली असून त्याला भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा हक्क आहे. भारतीय निवड समितीने रहाणेला कर्णधार बनवावे आणि कोहलीला फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगावे.”

भारताने जिंकली ऑस्ट्रेलियात सलग दुसरी मालिका

भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने प्रथम २०१८-२०१९ च्या दौऱ्यावर ही कामगिरी पहिल्यांदा केलेली. या वेळी भारतीय संघात नियमित कर्णधार विराट कोहली, अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांचा समावेश नव्हता. पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली होती.

महत्वाच्या बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून जमशेदपूरच्या आशा कायम

जस्टिन लँगर अतिशय कठोर प्रशिक्षक, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे भाष्य

भारत-इंग्लंड मालिकेचे प्रसारण करण्यासाठी पुढे आला हा समूह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---