इंग्लंडने भारतीय संघाचा लीड्स कसोटीत दारुण पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने एक डाव आणि 76 धावांनी सामना जिंकल्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता चाहत्यांच्या नजरा 2 सप्टेंबरपासून होणाऱ्या ओव्हल कसोटीवर लागलेल्या आहेत. ओव्हल कसोटीत भारत आणि इंग्लंड, दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात.
इंग्लंडचा संघ जोस बटलरशिवाय ओव्हलमध्ये उतरू शकतो. कारण बटलर लवकरच वडील होणार आहे आणि त्यामुळे तो या सामन्यातून माघार घेऊ शकतो. दरम्यान, इंग्लंडमध्ये समालोचन करणारा माजी लेग स्पिनर शेन वॉर्नने यजमानांना बटलरच्या जागी लियाम लिव्हिंगस्टोनला मैदानात उतरवण्याचा सल्ला दिला आहे.
लियाम लिव्हिंगस्टोन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा फलंदाज अलीकडेच द हंड्रेड स्पर्धेत खेळला, जिथे त्याने बर्मिंघम फिनिक्सला अंतिम फेरीत पोहचवले होते. लिव्हिंगस्टोनने स्पर्धेत सर्वाधिक 58 च्या सरासरीने 348 धावा केल्या आहेत. लियाम लिव्हिंगस्टोनने संपूर्ण स्पर्धेत 27 षटकार ठोकले आणि 22 चौकार खेचले. यावरून त्याच्या आक्रमकतेचा अंदाज लावला येईल त्याने चौकारापेक्षा जास्त षटकार मारले आहेत.
लियाम लिव्हिंगस्टोनला इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान देणे देखील काही चुकीचे नाही. कारण अलीकडेच यजमान संघाने तिसऱ्या कसोटीत टी-20 नंबर एकचा फलंदाज डेव्हिड मलानला संघात स्थान दिले होते आणि त्याने 70 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. लियाम लिव्हिंगस्टोन सध्या तुफान फॉर्ममध्ये खेळत आहे आणि अशा परिस्थितीत त्याला संधी देण्यात इंग्लड संघाचे काहीच नुकसान नाही. लिव्हिंगस्टोनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 शतकांच्या मदतीने 3057 धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टोनची सर्वोच्च धावसंख्या 224 धावा आहे.
जोस बटलर चौथ्या कसोटीत खेळला नाही तर लिव्हिंगस्टोनला संधी दिली जाऊ शकते. याशिवाय बटलर चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि तो तिन्ही कसोटींमध्ये धावा करू शकलेला नाही. बटलरने 14.40 च्या सरासरीने केवळ 72 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात पंतभाऊ वेगळ्याच धुंदीत, गोलंदाजाने रनअप घेतला; तरीही करत होता शॅडो बॅटिंग
भारताच्या ‘त्रिमूर्ती’लाही पुरुन उरला एकटा जो रूट, कामगिरी पाहून तुम्हीही कराल कौतुक