ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्न हा भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवचा कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनचा आवडता गोलंदाज आहे. वॉर्नबरोबरच्या आठवणींना उजाळा देत त्याने म्हटले की, जेव्हा वॉर्नला पहिल्यांदा भेटलो होतो, त्यावेळी पहिले १० मिनिटे काहीच बोललो नव्हतो.
भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीपने टीव्ही सादरकर्ता मेडोना टिक्झिराच्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान वॉर्नसोबतच्या आपल्या पहिल्या भेटीला उजाळा दिला. तो म्हणाला, “मी पुण्यात एका कसोटी सामन्यादरम्यान शेन वॉर्नशी भेटलो होतो. त्यावेळी अनिल कुंबळे आमचे प्रशिक्षक होते. आणि मी आपल्या प्रशिक्षकाला म्हणालो होतो की मला शेन वॉर्नला भेटायचे आहे.”
“शेवटी मी जेव्हा वॉर्नला भेटलो, त्यावेळी मी सुरुवातीची १० मिनिटे काहीच बोलू शकलो नव्हतो. ते अनिल भाईशी चर्चा करत होते आणि त्यांना काहीतरी सांगत होते. मी केवळ त्यांना ऐकत होतो. शेवटी मी बोलायला सुरुवात केली आणि आम्ही बरीच चर्चा केली. मी त्यांना आपली योजना सांगितली की, जेव्हा मी गोलंदाजी करतो, तेव्हा कसे वाटते. मी त्याला सांगितले की कशाप्रकारे मी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो,” असेही तो पुढे म्हणाला.
डावखुरा गोलंदाज कुलदीप म्हणाला की, त्या भेटीनंतर दोघांनीही एकमेकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली तसेच आपले विचारही सांगितले. तो म्हणाला, “त्यानंतर मी त्यांची (वॉर्नची) अनेकवेळा भेट घेतली आहे. ते नेहमी मला एका प्रशिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन करतात. ते माझ्या मित्राप्रमाणे बनले आहेत.”
“ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मी त्यांच्याबरोबर बराच वेळ घालविला आहे. मला नेहमी असे वाटते की, मला कोणत्याही सल्ल्याची आवश्यकता असेल, तेव्हा वॉर्न तिथे असतील. मी त्यांच्याशी फोनवर आणि मेसेजवरही खूप चर्चा करतो. जेव्हा मी युवा होतो, तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की माझी त्यांच्याशी भेट होईल. आणि त्यांच्यासोबत क्रिकेट तसेच गोलंदाजीबद्दल चर्चा करेल. त्यामुळे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती,” असेही तो पुढे म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-बरोबर ३० वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा
-दोन पुणेकर क्रिकेटर पोहचले चेन्नईला, सीएसकेच्या सराव शिबीरात घेणार भाग
-वयाच्या १८ व्या वर्षी एमएस धोनीला ओळख मिळवून देणाऱ्या स्पर्धेबद्दल घ्या जाणून…
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
-आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”
-या ३ खेळाडूंनी मारलेत सीएसकेसाठी सर्वाधिक षटकार