---Advertisement---

‘…तर सरळ कर्णधारालाच बॅन करा’; दिग्गजाने केली आगळीवेगळी मागणी

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 1:27 PM
root-virat
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना गाबाच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत ९ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसरा कसोटी सामना ॲडीलेडच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (१६ डिसेंबर) इंग्लंड संघाला निर्धारित वेळेत ९० षटक पूर्ण करता आले नाहीये. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने एक आगळा वेगळा सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने स्लो ओव्हर रेटसाठी एक खास सल्ला दिला आहे. त्याचे म्हणणे आहे की, स्लो ओव्हर रेटवर केवळ दंड आकारला जाऊ नये. तर संघाच्या कर्णधाराला एका सामन्यासाठी बॅन केलं पाहिजे. इंग्लंड संघाला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी निर्धारित वेळेत ९० षटके पूर्ण करता आली नाहीत. पहिल्या कसोटी सामन्यात देखील इंग्लंड संघावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली होती.

याप्रकरणी शेन वॉर्न म्हणाला की, ” स्लो ओव्हर रेटवर काय शिक्षा असायला हवी. याबाबत मी नेहमीच क्रिकेट कमिटीमध्ये माझे मत मांडत असतो. या कमिटीमध्ये अनेकांचे म्हणणे आहे की, फक्त दंड आकारून काही होणार नाही. कारण त्याचा संघावर काही परिणाम होताना दिसून येत नाहीये. त्याच्या ऐवजी कर्णधाराला एका सामन्यासाठी बॅन करा.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “पहिला कसोटी सामना झाल्यानंतर इंग्लंड संघातील सर्व खेळाडूंच्या मॅच फिसमध्ये १०० टक्के कपात करण्यात आली होती. परंतु त्यांनी पुन्हा एकदा तीच चूक केली आहे. त्या लोकांचं काय? ज्यांनी गाबामध्ये ९० षटक पाहण्यासाठी पैसे खर्च केले होते. त्यांना तर फसवणूक झाल्या सारखे जाणवत असावे. कर्णधाराला एक सामन्यात बॅन केलं तरच तो अशी चूक करण्यापासून परावृत्त राहिल.”

महत्वाच्या बातम्या :

विराट-बीसीसीआय विवादात भाजपच्या दिग्गज नेत्याचा नवीनच सुर, सचिनप्रमाणेच ‘या’ क्रिकेटपटूंना भारतरत्न देण्याची मागणी.

ऍशेस’ गाजवत असलेल्या वॉर्नरने गाठला विराट, कसोटी क्रमवारीत केली बरोबरी; स्टोक्सच्या हाती मात्र निराशा

पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा एमसीए वेस्ट झोन व युनायटेड स्पोर्ट्स अकादमी यांच्यात अंतिम लढत

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---