---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेन वॉर्नचे ‘ते’ तीन सामने, ज्यांनी त्याला बनवले ‘फिरकीचा जादूगार’

On: रविवार, मार्च 6, 2022 1:15 AM
Cricketer-Shane-Warne
---Advertisement---

शेन वाॅर्नने (Shane Warne) जगाला निरोप दिला आहे. शुक्रवारी (४ मार्च) वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर अनेक क्रिकेटप्रेमिनी आणि क्रिकेटपटूंनी ट्वीट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘फिरकीचा जादूगार’ अशी ओळख असलेला शेन वॉर्न आता मैदानावर दिसणार नाही, पण त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव क्रिकेट चाहत्यांच्या मनावरून कधीच कमी होणार नाही. या लेखात आपण वॉर्नच्या अशा तीन प्रसंगांबद्दल जाणून घेऊया, ज्या सामन्याने त्याला गोलंदाजीचा जादूगार बनवले.

‘द बॉल ऑफ द सेंच्युरी’
‘द बॉल ऑफ द सेंच्युरी’ला गेटिंग बॉल असे देखील म्हणतात. या एका खास चेंडूने शेन वॉर्नची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पूर्णपणे बदलून टाकली होती. ४ जून, १९९३ रोजी इंग्लंडविरुद्ध वॉर्नच्या गोलंदाजीतून असा चेंडू बाहेर पडला, ज्याने माईक गॅटिंगसह संपूर्ण क्रिकेट विश्वाला थक्क केले. ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचा दुसरा दिवस होता. इंग्लंडविरुद्ध वॉर्नचा तो पहिलाच चेंडू होता. गॅटिंग ४ धावांवर असताना वॉर्नने हा चेंडू टाकला, त्याला समजेल तोपर्यंत त्याचे ऑफ स्टंप उखडले होते. लेग-स्टंपच्या खूप बाहेर टाकलेला हा चेंडू एवढा वळला की, तो माईक गॅटिंगच्या ऑफ-स्टंपवर आदळला. वॉर्नच्या या चेंडूला ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ म्हटले जाते. त्यानंतर वॉर्नने कधीच मागे वळून पाहिले नाही.

हेही वाचा- श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हुकले शतक; मग निराश झालेल्या पंतने केले ‘हे’ काम; व्हिडिओ होतोय व्हायरल

१९९९ चा विश्वचषक
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९९९च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना सुरू होता. आफ्रिकेसमोर २१४ धावांचे आव्हान होते. त्यांनी विकेट जाऊ न देता ४८ धावा केल्या होत्या. संघ विजयाच्या दिशेने वेगाने पुढे जात होता. दक्षिण आफ्रिका चोकर्स टॅग संपवेल असे वाटत होते, पण त्यानंतर वॉर्नने चमत्कार केला. वॉर्नने तीन षटके टाकून सामना ऑस्ट्रेलियाच्या दिशेने वळवला. या सामन्याला सर्वकालिन महान एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना म्हटले जाते. या सामन्यात वॉर्नने १० षटकात २९ धावा देत ४ बळी घेतले होते.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील २००६ चा ऍडलेड सामना
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात २००६ साली ऍडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याचा तो पाचवा दिवस होता. सामान्याचा निकाल अनिर्णित राहील असे वाटत होते, पण वॉर्नने ते मान्य केले नाही. इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी घेतली आणि दुसऱ्या डावात ९ विकेट्स शिल्लक होत्या. वॉर्नमुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांत बाद झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ६ विकेटने जिंकला. या सामन्यात वॉर्नने ५ बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

Video: बुमराहने श्रीलंकन फलंदाजाला केले क्लिन बोल्ड, पण तोच चेंडू निघाला नो बॉल; बघून द्रविडही नाराज

अय्योव! विराट शतक करेपर्यंत कट्टर चाहत्याने लग्न न करण्याची घेतली शप्पत, फोटो तुफान व्हायरल

एक-दोन नव्हे पाचव्यांदा रिषभ पंतचे हुकले कसोटी शतक; म्हणाला, ‘कधी कधी मला असे वाटते…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---