विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्या काही वर्षात अनेक मोठे विजय मिळवले आहेत. सध्याच्या क्रिकेट विश्वात भारतीय संघ मजबूत संघांपैकी एक मानला जातो. नुकतेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने ४ सामन्यांनंतर २-१ अशी आघाडी घेतली होती. ही कामगिरी पाहून अनेकांनी भारतीय संघाचे कौतुकही केले आहे.
असे असले तरी, ऑस्ट्रलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नने सध्याच्या भारतीय संघाची फलंदाजी पूर्वीच्या भारतीय संघाच्या फलंदाजीपेक्षा कमजोर असल्याचे म्हटले आहे. वॉर्नच्या मते सध्याच्या भारतीय संघाची फलंदाजी प्रभावशाली आहे, पण राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सुवर्णकाळापेक्षा जास्त नाही.
सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग आणि लक्ष्मण यांना ‘फॅब फाईव्ह’ म्हटले जायचे, त्यांनी अनेक दिग्गज गोलंदाजांचा त्यांच्या काळात सामना केला होता. वॉर्नही त्यांच्याविरुद्ध अधिक खेळला.
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना वॉर्न म्हणाला, ‘त्यांची (सध्याच्या भारतीय संघाची) फलंदाजी द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सचिन, सेहवाग यांच्या जवळपासही जाणारी नाही. विराट या ग्रहावरील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, जरी तो सर्व प्रकारांमध्ये सर्वोत्तम नसला तरी. पण जेव्हा तुम्ही द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सचिन, सेहवाग या अव्वल ५ जणांना पाहाता, तेव्हा ते इतकेही वाईट नाही. मला वाटत नाही की आत्ताची भारतीय फलंदाची सर्वोत्तम आहे.’
असे असले तरी वॉर्नने रोहित शर्मा आणि रिषभ पंतचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. मला वाटते रिषभ पंतही सुपरस्टार होण्याच्या मार्गावर आहे. पण मला वाटते त्यांचे वेगवान गोलंदाजच आहेत, ज्यांनी भारताला केवळ मायदेशातच नाही, तर प्रत्येक परिस्थिती विजय मिळवण्यासाठी सक्षम बनवले आहे.’
गेल्या काही वर्षात भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी कौतुकाचा विषय ठरली आहे. भारतीय गोलंदाजांनी परदेशात विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही भारताच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी प्रभावशाली होती. या दौऱ्यातील अखेरचा कसोटी सामना कोविड-१९ च्या कारणाने रद्द करावा लागला. या मालिकेत भारतीय संघ ४ सामन्यांनतर २-१ अशा फरकाने आघाडीवर होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराटसोबत राजकारण होतेय”, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा खळबळजनक आरोप
अरेरे वाईट झालं! शर्यत जिंकूनही शूजमुळे ‘तो’ ठरला विजेता म्हणून अपात्र
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच सीएसकेला मोठा धक्का, सलामीवीराला झाली दुखापत