येत्या काही दिवसात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिका पार पडणार आहे. या मालिकेपूर्वी देशातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच ही मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाचा अपघात झाला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न हा मोटरसायकल अपघातात जखमी झाला आहे. तो मुलगा जॅक्सनसोबत मेलबर्नमध्ये ३०० किलो वजनाची बाइक चालवत होता. शेन वॉर्नला गंभीर दुखापत झालेली नाही, पण त्याच्या नितंब, गुडघा आणि घोट्याला दुखापत झाली आहे. मात्र, त्याच्या मुलालाही दुखापत झाली की नाही, याबाबत कोणतीही माहिती नाहीये.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न आपला मुलगा जॅक्सनसह बाईक चालवत होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते १५ मीटर पर्यंत घासत गेले होते. अपघात झाल्यानंतर शेन वॉर्नने म्हटले की, ” मला थोडी दुखापत झाली आहे. मी खूप निराश आहे.” शेन वॉर्नला जास्त दुखापत झाली नाहीये. परंतु, अपघात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला वेदना जाणवल्या होत्या.
शेन वॉर्नला भीती होती की, या अपघातात त्याचा पाय मोडला असावा किंवा त्याच्या नितंबात फ्रॅक्चर झाले असावे, या भीतीने त्याने हॉस्पिटलला भेट दिली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत शेन वॉर्न समालोचन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शेन वॉर्न हा सर्वात यशस्वी गोलंदाजापैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत ३०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण १४५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ७०८ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर, १९४ वनडे सामन्यात त्याला २९३ गडी बाद करण्यात यश आले आहे. टी २० कारकिर्दीत त्याने ७३ सामन्यात ७० गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन?
पदार्पणात भीषण अपघात, आफ्रिदीचा बाऊंसर डोक्याला लागल्याने बांगलादेशचा खेळाडू गंभीर जखमी
द्रविडने केएस भरतविषयी केली होती ‘ही’ भविष्यवाणी, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितला किस्सा






