ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तो नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शेन वॉर्न हा सर्वोत्तम लेग स्पिनर म्हणून ओळखला जातोच, पण त्याशिवाय तो अनेकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. महिलांसोबतचे त्याचे संबंध असो किंवा बीबीएल स्पर्धेदरम्यान मार्लन सॅम्युअल्ससोबतचा वाद असो. ऑस्ट्रेलियन संघातील त्याचे अनेक सहकारी वॉर्नच्या वागण्यामुळे आणि इतर खेळाडूंशी वारंवार होणाऱ्या भांडणामुळे त्याच्याशी जुळले नाहीत. आता शेन वॉर्नबद्दल त्याच्या एका मित्राने एक नवीन खुलासा केला आहे.
दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न नेहमीच पार्टींमध्ये महिलांनी घेरलेला असतो याबद्दल अनेक वृत्ते देखील समोर आली आहेत. विशेषतः या वस्तुस्थितीमुळे त्याला ‘लेडीज मॅन’ म्हणूनही ओळखले जात होते. ट्रिपल एम सिडनी रेडिओ होस्ट लॉरेन्स मुनी, वॉर्नच्या पार्ट्यांमध्ये नेहमी जात होता. त्याने अलीकडेच शेन वॉर्नच्या पार्ट्या कशा होत्या हे सांगितले. यासह त्याने खुलासा केला की शेन वॉर्न अजूनही वयाच्या ५१ व्या वर्षी टिंडरवर आहे.
डेलीमेल यूकेच्या अहवालानुसार, मूनीने सांगितले की, वॉर्न ५१ वर्षांच्या वयातही टिंडरचा वापर कसा करत आहे. त्याला नवनव्या प्रेयसी बनवायच्या आहेत. त्याचे आयुष्य टिंडर, बिअर, डार्ट्स, जुगार आणि क्रिकेट या गोष्टींनी घेरलेले आहे.
रेडिओ होस्ट मूनीने पुढे स्पष्ट केले की, “ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न नेहमी महिलांच्या संपर्कात येण्यासाठी कोणतीही पार्टी लवकर सोडत असायचा. तो फक्त ड्रिंक्स घेण्यासाठी पार्टीमध्ये येत होता. शेन वॉर्न सहसा त्याच्या सहकाऱ्यांसोबत मद्यपान करायचा आणि नंतर मुलींसोबत गायब व्हायचा. सेलिब्रिटींसोबतच्या प्रसिद्ध संबंधांमुळे त्यांची अशी प्रतिष्ठा होती.”
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी १४५ कसोटी आणि १९४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ७०८ कसोटी विकेट्स आणि २९३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. १००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा शेन वॉर्न जगातील दुसरा क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड संघाला जबर धक्का! ‘हा’ गोलंदाज टी२० विश्वचषकासह ऍशेसमधून बाहेर
जिमीने गाठला जम्बो! विराटला बाद करताच अँडरसनने केली कुंबळेशी बरोबरी
Video: बेअरस्टोच्या चपळाईने संपली भारतीय उपकर्णधाराची खेळी, थेट फेकीवर रहाणे ‘धावबाद’