---Advertisement---

‘हा’ गोलंदाज म्हणतोय, ‘मी बॉलिंग करत असताना शेन वॉर्न मला आभाळातून बघत असतो’

On: मंगळवार, मे 24, 2022 11:40 AM
Cricketer-Shane-Warne
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील अंतिम चार संघ मिळाले आहेत. या चार संघामध्ये राजस्थान रॉयल्स संघाचाही समावेश आहे. विशेष गोष्ट अशी की या आयपीएल हंगामात पोहचलेल्या चार संघांमध्ये केवळ राजस्थानच असा संघ आहे, ज्यांनी यापूर्वी आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. राजस्थानने २००८ साली पहिली आयपीएल ट्रॉफी शेन वॉर्न याच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. तेव्हापासून राजस्थानशी वॉर्नचे नाते घट्ट विनले गेले. आता वॉर्नबद्दल आदर व्यक्त करताना युजवेंद्र चहल याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

चहलने (Yuzvendra Chahal) म्हटले आहे की, वॉर्नचा (Shane Warne) वारसा लाभलेल्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) जोडला गेल्याने तो भाग्यशाली आहे. वॉर्नचा आशिर्वाद त्याच्या बरोबर आहे. वॉर्नचे काही महिन्यांपुर्वी निधन झाले होते.

राजस्थान रॉयल्सच्या प्रसिद्धीपत्रकानुसार चहल म्हणाला, ‘मला माहित आहे की, राजस्थान रॉयल्ससाठी माझा पहिला हंगाम आहे. पण असे वाटत आहे की, मी या संघाकडून खूप वर्षांपासून खेळत आहे. मला म्हणायचे आहे की संघाला श्रेय जाते की मला त्यांनी खेळण्याची संधी दिली.’

‘ज्याप्रकारे ते माझा सन्मान करतात आणि माझ्यावर प्रेम करतात, त्यामुळे मी एका वेगळ्याच स्तरावर फ्रँचायझीशी जोडला गेलो आहे. दुसरीकडे माझ्यासाठी हे माझ्यासाठी खास आहे की, शेन वॉर्न सर राजस्थानसाठी खेळले आहेत आणि ते पहिले रॉयल आहेत. त्यांचा आशिर्वाद माझ्यापाठीशी आहे. मला असे वाटते की, ते मला वरून गोलंदाजी करताना बघत आहेत,’ असेही चहल म्हणाला.

याबरोबरच चहलने त्याच्या अविस्मरणीय क्षणांबद्दलही खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ४० धावा देऊन ५ विकेट्स घेणे माझ्यासाठी खास क्षण होता. तो सामना माझ्यासाठी खरंच खास होता, कारण त्यातील हॅट्रिक महत्त्वपूर्ण होती. माझ्या कारकिर्दीतील ही पहिली हॅट्रिकपण होती.’

तो पुढे म्हणाला, ‘आमच्यासाठी तेव्हा दबावाची परिस्थिती होती. त्यांना ४० षटकांत ४० धावा पाहिजे होत्या. त्यावेळी संजूने मला चेंडू हातात दिला आणि म्हणाला, आता सर्वकाही तुझ्यावर आहे की, तू कशी गोलंदाजी करणार. मी फक्त विकेट घेण्याचा विचार करत होतो. कारण संघाला त्याचीच गरज होती. मला वाटते वाटते की अशा क्षणांमुळे तुम्ही संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकता.’

चहल गेली अनेकवर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत होता. पण २०२२ आयपीएलपूर्वी (IPL 2022) त्याला बेंगलोरने मुक्त केले. त्यामुळे यंदा लिलावात राजस्थान रॉयल्सने चहलवर ६.५० कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला संघात सामील करून घेतले. चहलनेही त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवत आत्तापर्यंत या हंगामात १४ सामन्यांत १६.५३ च्या सरासरीने २६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सध्या या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘दिनेश कार्तिकला परत संधी दिली, मग शिखर धवनला का नाही’, दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचा प्रश्न

‘ईडन गार्डन माझं होम ग्राउंड…’, जिथे बॅट धरायला शिकला, त्याच मैदानाबद्दल काय बोलून गेला साहा

उच्चशिक्षित भारतीय शिलेदार, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---