ऑस्ट्रेलिया माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याचे शुक्रवारी (४ मार्च) अकाली निधन झाले. वॉर्न थायलंडमध्ये स्वतःच्या मालकिच्या विलावर असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचे निधन झाल्याचे समजते. त्याच्या व्यवस्थापनाने वॉर्न आता जगात नसल्याची पुष्टी केली. निधनानंतर वॉर्न त्याच्या मागे कुटुंबासाठी कोट्यावधी रुपयांची संपत्ती सोडून गेला आहे.
वॉर्नने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कसली कमतरता आल्याचे दिसले नव्हते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी वॉर्नने १५ वर्ष क्रिकेट खेळले. निवृत्ती घेतल्यानंतर शेन वॉर्न अनेक मोठ्या चॅनल्समध्ये क्रिकेट एक्सपर्टच्या रूपात काम करताना दिसला. क्रिकेटव्यतिरिक्त इतर श्रेत्रातही त्याने मोठ्या प्रमाणात पैसे कमावले. वॉर्न अनेकदा जाहिरातीमध्ये काम करतानाही दिसला.
सेलिब्रिटी नेट वर्थ वेबसाइटच्या माहितीनुसार शेन वॉर्नची एकूण संपत्ती जवळपास ५० मिलियन डॉलर्सची आहे. भारतात याची किंमत जवळपास ३८१.८६ कोटी रुपये होते. वॉर्नने ही कमाई क्रिकेट खेळून, समालोचन करून, जाहिरातींमध्ये काम करून आणि इतर काही व्यावसायांमधून जमवली आहे. निवृत्तीनंतर तो सेलिब्रिटी क्रिकेट सामनेही खेळला. वॉर्न एक हसमुख व्यक्तिमत्व होते आणि याच कारणास्तव तो क्रिकेटव्यतिरिक्त इतरही गोष्टींमुळे चर्चेच असायचा.
त्याच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील एक महान खेळाडू होता. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याचा दुसरा क्रिमांक होता. वॉर्नने ऑस्ट्रेलियन संघासाठी १४५ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ७०८ विकेट्स नावावर केल्या. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० विकेट्स घेतल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामने खेळले आणि यामध्ये २९३ धावा केल्या आहेत. असे असले तरी, या दिग्गज गोलंदाजाला कधी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बनता आले नाही. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधाराची भूमिका मात्र त्याने चांगल्या प्रकारे पार पाडली.
महत्वाच्या बातम्या –
रिषभ ९६ धावांवर बाद होताच गावसकर, धोनी यांच्या ‘या’ विक्रमांशी झाली बरोबरी
वॉर्नने क्रिकेटविश्व गाजवल खरं, मात्र पहिल्या सामन्यात शास्त्रींनी केलेली धुलाई तो विसरला नाही
राजस्थानच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी ‘या’ क्रिकेटरची नियुक्ती; तयार करणार ‘रॉयल’ खेळाडू