ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचे शुक्रवारी (४ मार्च) आकस्मित निधन झाले. त्याच्या निधनाने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे वॉर्नचे निधन झाले. शेन वॉर्नने निधनापूर्वी भारतीय संघाच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली होती. विशेष गोष्ट ही आहे की, वॉर्नने निवडलेल्या या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये दिग्गज एमएस धोनी आणि विराट कोहली यांचा समावेश नव्हता.
शेन वॉर्न (Shane Warne) याच्या निधनाने क्रिकेट विश्वातील सर्व खेळाडूंसोबत त्याचे जगभरातील चाहते दुःख व्यक्त करत आहेत. निधानाच्या आधी वॉर्नने निवडलेल्या भारताच्या सर्वोत्तम ११ खेळाडूमध्ये एमएस धोनी आणि विराट कोहली या भारतीय माजी कर्णधारांना संधी दिली नाही. याचे कारणही वॉर्नने सांगितले होते. दरम्यान, वॉर्नने ज्या ११ खेळाडूंना निवडले, त्या सर्वांसोबत तो स्वतः खेळला आहे. या दोघांसोबत खेळण्याची संधी मिळाली नसल्यामुळे त्याला त्यांची निवड करता आली नाही.
हे खेळाडू होते प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी
शेन वॉर्नने प्लेइंग इलेव्हनमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचा निवडले. वीरेंद्र सेहवाची तुफानी खेळी सर्वांना माहीत आहे, तर वॉर्नच्या मते सिद्धू एक असे खेळाडू आहेत, जे फिरकी गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने खेळायचे. याच पार्श्वभूमीवर त्याने या दोघांना सलामीसाठी निवडले होते. त्यानंतर सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले आणि एके काळचा महान कसोटी फलंदाज राहुल द्रविडला तिसऱ्या क्रमांकासाठी निवडले होते. द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि ते संघाला अचडणीतून बाहेर काढू शकत होते.
मध्यक्रमात वॉर्नने महान फलंदाज सचिन तेंडुलकरची निवड केली, तर कर्णधाराच्या रूपात सौरव गांगुलींची निवड केली. त्याव्यतिरिक्त मध्यक्रमात मोहम्मद अजरुद्धीन, कपिल देव आणि यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात नयन मोंगिया यांची निवड केली. गोलंदाजाच्या रूपात वॉर्नने हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांची नावे घेतली घेतील होती.
शेन वॉर्नने निवडलेली सर्वोत्तम भारतीय प्लेइंग इलेव्हन –
सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, नवजोत सिंह सिद्धू, राहुल द्रविड, सचिन तेंदुलकर, मोहम्मद अजहरुद्दीन, कपिल देव, नयन मोंगिया (यष्टीरक्षक), हरभजन सिंह, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे.
महत्वाच्या बातम्या –
दीडशेपेक्षा जास्त धावा कुटल्यानंतर त्याच कसोटीत ८-९ विकेट्सही चटकावणारे अष्टपैलू, जडेजाचाही समावेश
पाकिस्तानी महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने मिळवला सोपा विजय
Video: ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यावर धवन-चहलची धमाल, एनसीएमधील कर्मचाऱ्यांबरोबरही मस्ती