कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन याच्या (Muttiah Muralitharan) नावे आहे. मुथय्या मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८०० गडी बाद केले आहेत. हा विक्रम आजवर कोणालाही तोडता आला नाहीये. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने दोन अशा गोलंदाजांची नावे सांगितली आहेत, जे मुथय्या मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मोडू शकतात.
शेन वॉर्नने केलेल्या भविष्यवाणीनुसार दोन असे गोलंदाज आहेत, जे मुथय्या मुरलीधरनचा सर्वाधिक गडी नाद करण्याचा विक्रम मोडू शकतात. यामध्ये त्याने पहिले नाव भारतीय संघातील दिग्गज फिरकीपटू आर अश्विनचे (R Ashwin) सुचवले आहे. तर दुसरे नाव ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनचे (Nathan Lyon) आहे. शेन वॉर्नच्या मते, केवळ हे दोन गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम करू शकतात. त्याचे म्हणणे आहे की, हे दोघे मुथय्या मुरलीधरनला मागे टाकून १००० गडी बाद करण्याचा देखील पराक्रम करू शकतात.
याबाबत बोलताना शेन वॉर्न म्हणाला की, “आपण जितकं फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहतो, क्रिकेट आणखी मनोरंजक होऊ लागतं. मला आशा आहे की, आर अश्विन आणि नाथन लायन कसोटी क्रिकेटमध्ये १००० गडी बाद करतील.”
तसेच त्याने आर अश्विनचे कौतुक करत म्हटले की, “आर अश्विनची गोलंदाजी दिवसेंदिवस आणखी चांगली होत चालली आहे. मी स्वतः आर अश्विनचा चाहता आहे. त्याला पाहून असं वाटतं की, तो नेहमी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो.”
मुथय्या मुरलीधरनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ११३ कसोटी सामन्यात ८०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर आर अश्विनने आतापर्यंत ८४ कसोटी सामन्यात ४३० गडी बाद केले आहेत. तर नॅथन लायनने १०५ कसोटी सामन्यात ४१५ गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित करणार नेतृत्त्व; कोण होणार संघात इन आणि कोण होणार आऊट? वाचा सविस्तर
हे नक्की पाहा: