भारताचा प्रतिभाशाली अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांचे एकमेकांवरील प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. शुक्रवारी (०४ मार्च) वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने (Shane Warne Died Of Heart Attack) आकस्मिक मृत्यू झाला आहे. तो वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी सर्वांना सोडून गेल्यानंतर क्रिकेटविश्व हळहळले आहे. जडेजानेही त्याच्या निधनानंतर ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. यादरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) जडेजा आणि वॉर्नचा जुना फोटो (Jadeja And Warne’s Old Picture) शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना प्रचंड भावला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) शेअर केलेल्या फोटोमध्ये मागे वॉर्न आणि जडेजा एकत्र उभे असल्याचे दिसत आहेत. तसेच दिवंगत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू वॉर्न जडेजाला काहीतरी बोलताना दिसत आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की, त्या दोघांचे एकमेकांसोबतचे नाते खूप खास होते.
जडेजाने सध्या श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात धुव्वांदार दीडशतक ठोकले आहे. त्याने ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १७५ धावा विक्रमांचे मनोरे रचले आहेत. त्याच्या या शानदार खेळीनंतर सीएसकेने वॉर्न-जडेजाचा एकत्र फोटो असलेली ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सीएसकेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वांच्या पलीकडे असलेले नाते.’ या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत.
https://www.instagram.com/p/CauRWcsBpYW/?utm_source=ig_web_copy_link
वॉर्नने जडेजाला दिले होते खास नाव
दरम्यान ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिन महान फिरकीपटू वॉर्नने जडेजाला खास नावही दिले होते. त्याने जडेजाला रॉकस्टार असे टोपननाव दिले होते. याबद्दल नुकताच माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याने खुलासा केला आहे. मोहाली कसोटीत शतक ठोकल्यानंतर हरभजनने ट्वीट करत लिहिले की, खूप चांगले जडेजा (रॉकस्टार). पुढेही असाच खेळत राहा. महत्वाचं, जडेजाला रॉकस्टार हे नाव वॉर्नने दिले होते.
Absolutely shocked to hear about Shane Warne. A terrific statesman of our game. May God bless his soul and my condolences to his loved ones. 🙏🏻
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 4, 2022
जडेजानेही वॉर्नला वाहिली श्रद्धांजली
वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. जडेजानेही आपल्या आवडत्या खेळाडूला श्रद्धांजली वाहिलीआहे. शेन वॉर्नच्या निधनाबद्दल ऐकल्यानंतर मला धक्का बसला आहे. वॉर्न क्रिकेट या खेळातील सर्वोत्तम खेळाडू होता. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. त्याच्या कुटुंबियांप्रती मी सहानुभूती व्यक्त करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या पत्रकाराने दिली साहाला धमकी, तो स्वत:हूनच आला सर्वांसमोर; क्रिकेटरला पाठवणार मानहानीची नोटीस
दोन आठवडे दारूच्या थेंबालाही नव्हतं शिवलं; शेन वॉर्नच्या निधनानंतर मॅनेजरचा दावा