मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीनंतर आता महान फिरकीपटू शेन वार्नचे आत्मचरित्र येत आहे.
मैदानावर अाणि बाहेर असे दोन्हीकडे कारकिर्द गाजविणाऱ्या या खेळाडूचे हे आत्मचरित्र आॅक्टोबर महिन्यात येणार आहे.
४ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या या आत्मचरित्राचे नाव नो स्पीन असे आहे.
या पुस्तकाच्या पब्लिशरच्या म्हणण्यानुसार, यात अनेक गोष्टी असणार आहे ज्या चाहत्यांनी कधी ऐकलेल्या नसतील. हे एक क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम आत्मचरित्र असणार आहे.
१३ सप्टेंबर १९६९ रोजी जन्मलेल्या वार्नला जगातील महान फिरकीपटू म्हणुन ओळखले जाते. १९९२ मध्ये तो आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि कारकिर्दीत एकुण १००० विकेट्स घेतल्या. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजारपेक्षा जास्त धावा देखील केल्या.
आयपीएलमधील राजस्थान राॅयल्सचा तो कर्णधार देखील राहिला आहे. २०१३मध्ये हा दिग्गज खेळाडू सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स
–आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती